कॉ. गैबू जैनेखान : निपाणीत सिटूतर्फे वार्षिक अधिवेशन
निपाणी : जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे नागरिकांमध्ये केंद्र सरकार विरोधात संतापाची लाट आला आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले आहेत. त्या विरोधात नागरिकांनी जेलभरो आंदोलन आंदोलने करून रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे मत सिटू संघटनेचे जिल्हा सचिव कॉ. गैबू जैनेखान यांनी केले. सिटू संघटनेच्या वतीने एकदिवसीय अधिवेशन येथे पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉ. सी. ए. खराडे होते. कॉ. दिलीप वारके यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी दिवंगत कॉम्रेडना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कॉ. जैनेखान म्हणाले, सद्यस्थितीत राज्यासह बेळगाव जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कामगारांची संख्या लक्षणीय आहे, असे असले तरी अनेक कामगार हंगामी तत्त्वावर काम करत आहेत. अशा कामगारांना केंद्र व राज्य सरकारकडून मिळणार्या सोयी, सुविधा व योजना यांचा लाभ घेता येत नाही. यासाठी सरकार दरबारी आशा कामगारांना हंगामी ऐवजी कायमस्वरूपी सेवेत रुजू करून योग्य त्या सवलती व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शिवाय मानधन व भत्यात वाढ करावी. यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. यासाठी कामगारांची एकजूट असणे गरजेचे आहे. सिटू संघटनेच्या माध्यमातून कामगारांची संघटना बांधली जाऊन कामगारांच्या अपेक्षित गरजांची व मागण्यांची पूर्तता केली जाईल. कॉ. सी. ए. खराडे म्हणाले, प्रत्येकाने समाजाच्या वेगवेगळ्या कष्टकरी जनतेच्या बदल घेऊन जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याबाबत जनजागृती करून कळवळ उभे करणे हे सभासदांचे कर्तव्य आहे. विविध पदावर कामगार प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडत आहेत. असे असले तरी सरकारकडून मानधन व त्यांना मिळणार्या सोयी सुविधा मिळत नसल्याने त्यांची अडचण होत आहे. त्यामुळे सध्या अशा कामगार वर्गांसाठी सरकारने पुढे येणे गरजेचे आहे. सकाळच्या सत्रात कॉम्रेड सी. ए. खराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर क्रांती गीत सादर करण्यात आले.
कॉ. दिलीप वारके, कॉ. प्रसन्नकुमार गुजर, कॉ. सुरेश बडीगेर, सुधाकर माने प्रा. नायकू खोत, जी. व्ही. कुलकर्णी, बाबुराव सुतार, आप्पासाहेब लोहार, अनिल मगदूम, परविन नाईकवाडे, अल्लाउद्दीन जमादार, विक्रम शिंदे, कॉ. अनिल ढेकळे, कॉ. मारुती हरेकर यांच्यासह तालुक्यातील संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
संकेश्वर स्थायी समिती सभापतीपदी प्रमोद होसमणी यांची निवड
Spread the love संकेश्वर : संकेश्वर नगरपालिकेची मंगळवारी बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर …