
युवा नेते उत्तम पाटील यांचा नागरिक सत्कार
निपाणी (वार्ता) : कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना स्वार्थ बाजूला ठेवून समाजाच्या कल्याणासाठी केलेले कार्य महत्त्वपूर्ण ठरते. विकासाच्या वाटेत जाती, धर्म, प्रांत, पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला असतात त्यामध्ये रोजगार हा महत्वाचा ठरतो. त्यामुळे हाताला काम आणि पोटाला भाकरी मिळते. त्यामुळे तरूणांची मान स्वाभिमानाने ताठ होते. अशाच प्रकारचे काम अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून होत आहे. आता या समूहाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी युवा नेते उत्तम पाटील यांच्या पाठीशी सदैव राहून युवकांनी राजकारणाचा चेहरा मोहरा बदलावा, असे मत शिरूर (पुणे) येथील खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले केले.
युवा नेते उत्तम पाटील यांना पुणे येथील साखर उद्योगातर्फे युथ आयकॉन पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यानिमित्त निपाणी मतदारसंघातील उत्तम पाटील प्रेमी नागरिकातर्फे त्यांचा डॉ. कोल्हे यांच्या हस्ते तवंदी येथे नागरी सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, सहकारमहर्षी रावसाहेब पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पाटील वअभिनंदन पाटील यांनी सर्व भेद ओलांडून देण्याचे काम करून विविध संघ संस्थांच्या माध्यमातून माध्यमातून भरभरून अखंडीतपणे कार्य केले आहे. तरूणाईच्या हाताला रोजगार उपलब्ध करून मनात स्वाभिमान निर्माण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत्व, महात्मा बसवेश्वरांनी शांती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रांगेतल्या शेवटच्या मानसाला आपल्या अधिकारांची जाणीव, महात्मा फुले, छत्रपती शहू महाराजांनी समतेच्या तत्वांचा संदेश दिला. या मातीत माणसाने माणसाशी आधी माणसासारखे वागले पाहिजे ही गोष्ट कोरून ठेवली. हीच तत्वे वाळवून अरिहंत उद्योग समूह कार्यरत आहे. युवकांनी जात, धर्माचा अहंकाराचा न्यूनगंड बाळगू नये. आपल्या कर्तृत्वाला श्रेष्ठत्व देत त्यानुसार कार्यरत राहून आपल्या धर्म, समाजाच्या प्रगतीत हातभार लावावा. सामाजिक, आर्थिक, औद्योगीक क्षेत्रात बजावलेल्या अतुलनीय कामगिरीची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या भारतीय शुगर या संस्थेकडून युथ आयकॉन म्हणून गौरव होणे म्हणजे मोठे काम आहे. आगामी काळात युवकांनी अरिहंत समूहाच्या पाठिशी राहून उत्तम पाटील यांचे हात बळकट करावेत.
उत्तम पाटील म्हणाले, सहकारमहर्षी रावसाहेबदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अरिहंत उद्योग समुहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील आणि अरिहंत परिवाराच्या खंबीर प्रेरणेने अथकपणे समाजहिताची काम सुरू आहेत. आगामी काळात स्वतःला जनसेवेकरीता वाहून घेवून काम करण्यासाठी कटिबध्द आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते झालेल्या हा भव्य सत्कार सोहळा आपणास अविस्मरणीय असून त्यांच्यापासून प्रेरणा मिळून आणखीन नव्या उमेदीने काम करणार असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले.
यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अमित शिंदे, परशुराम कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, युवा उद्योजक अभिनंदन पाटील, हालशुगरचे माजी उपाध्यक्ष राजू पाटील, नगरसेवक विलास गाडीवड्डर, रविंद्र शिदे, माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी, माजी उपनगराध्यक्ष सुनिल पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, जयवंत कांबळे, गणी पटेल, श्रीनिवस संकपाळ, हर्षल सुर्वे, मीनाक्षी पाटील, धनश्री पाटील, विनश्री पाटील, दिपाली पाटील, वैष्णवी पाटील, नगरसेविका अनिता पठाडे, शांता सावंत, बाळासाहेब सुर्यवंशी, इम्रान मकानदार, शिरीष कमते, दिलीप पठाडे, शशीकांत गोरवाडे, राजेंद्र कंगळे, संजय सांगावकर, गजानन कावडकर, निरंजन पाटील-सरकार, अरूण निकाडे, इंद्रजीत पाटील, डॉ. विनय निर्मळे, चेतन स्वामी, अभय कुमार मगदूम, इंद्रजीत पाटील, नम्रता कमते, श्याम रेवडे, सुंदर पाटील, दिगंबर कांबळे, रोहित पाटील, प्रदीप माळी, महेश पाटील, सुदेश बागडी यांच्यासह निपाणी मतदारसंघातील नागरिक उपस्थित होते. महेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. के. डी. पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta