कोगनोळी : येथील छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ ट्रस्टचे उपाध्यक्ष उमेश पाटील यांची पुतणी समृद्धी महेश पाटील हिने नेट, सीईटी परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. नेट परीक्षेमध्ये 97.53% तर सीईटी परीक्षेत 99.88% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. सीईटीमधून कोल्हापूर विभाग चाटेमधून तिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल चाटे शिक्षण समूहाच्या वतीने उद्योजक बाळ पाटणकर, भरत खराटे यांच्या हस्ते गोल्ड मेडल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ११ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी एकनाथ अंबुकर, प्राध्यापक प्रशांत देसाई, डॉक्टर अजिंक्य देशपांडे, प्राध्यापक मधुकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तिच्या या यशाबद्दल कोगनोळी पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta