Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूरात तालुका भाजपच्यावतीने पंडित दिन दयाल उपाध्याय जयंती साजरी

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने येथील रेल्वेस्टेशन रोडवरील भाजपच्या कार्यालयात पंडित दिन दयाल उपाध्याय जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी पंडित दिन दयाळ उपाध्याय यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सुनील नायक यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी उपाध्याय यांच्या कार्याबद्दल आपले विचार व्यक्त केले.
तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, नेते विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, माध्यम प्रमुख राजेंद्र रायका, जिल्हा कार्यकारिणी सदस्य किरण यळ्ळूरकर, सेक्रेटरी गुंडु टोपीनकट्टी, कार्यालय सेक्रेटरी प्रकाश निलजकर, सर्व शक्तिकेंद प्रमुख सुनिल नायक, सयाजी पाटील, मोहन पाटील, चांगप्पा निलजकर, नारायण पाटील आकाश अथणीकर, रवि पाटील, सुब्राव पाटील तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *