कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या राजीव गांधी नगर जवळ कार व मालवाहू रिक्षा अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 26 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
दिलीप सांगावे राहणार सौंदलगा हे गंभीर जखमी तर वसंत रणदिवे सौंदलगा हे किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून व पोलिसांच्या कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सौंदलगा तालुका निपाणी येथून कागल येथे बाजारासाठी जात असलेली मालवाहू तीन चाकी रिक्षा येतील राजीव गांधी नगर जवळ आले असता निपाणीहून कोल्हापूरकडे जात असलेल्या कारची रिक्षाला जोराची धडक बसली. मालवाहू रिक्षा रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. यामध्ये असणाऱ्या दोघांपैकी एक जण गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाला. जखमींना निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
घटनास्थळी कोगनोळी पोलीस स्टेशनचे राजू गोरखनावर व शिवप्रसाद यांनी पाहणी केली. जय हिंद रोड डेव्हलपरचे कर्मचारी विनायक केस्ती व कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीस खुला करून दिला.
Belgaum Varta Belgaum Varta