Monday , December 8 2025
Breaking News

आगामी विधानसभा आपणच लढविणार!

Spread the love
माजी आमदार काकासाहेब पाटील : अफवांवर विश्वास ठेवू नका
निपाणी (वार्ता) : काँग्रेसचे नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या अग्रवास्तव आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. असे असतानाही काही दिवसांपूर्वी निपाणी झालेल्या कार्यक्रमात उत्तम पाटील यांनी केलेल्या भाष्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्र अवस्था निर्माण झाली होती. याशिवाय अनेक अफवा मतदारसंघात फसविला जात आहेत त्यावर कार्यकर्त्यांनी विश्वास न ठेवता आगामी निवडणूक आपण लढणार असून आतापासून सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले. बुधवारी (ता.२८) सायंकाळी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या कुटुंबाबरोबर आपले १९७८ पासून घरोब्याचे संबंध आहेत. पण घरगुती संबंध आणि राजकीय संबंध वेगवेगळे आहेत. पाटील परिवाराच्या सुखदुःखात आम्ही नेहमी सहभागी होत असतो. उत्तम पाटील हे काँग्रेसचे सभासद नसून आपण या पक्षासाठी गेली 40 वर्षे काम करत आहोत. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार, माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह काँग्रेसची नेते मंडळी आपल्या बरोबरच आहेत. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार म्हणून आपण विधानसभेचे निवडणूक लढविणार आहोत. त्यामुळे उत्तम पाटील यांनी या पुढील काळात अशा चुका टाळाव्यात.
बोरगावमधील अण्णासाहेब हवले यांनी शिक्षण संस्था बँका सोसायटीद्वारे रचनात्मक कार्य केले आहे, त्यामुळे या गावातून आपण 25 टक्के मतदान घेऊ शकतो त्यामुळे कोणीही अफवावर विश्वास न ठेवता निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने कामाला लागणे आवश्यक आहे. आगामी निवडणूक तिरंगी होणार असून भाजपा हा शत्रू पक्ष प्रबळ आहे. त्यामुळे जशास तसे उत्तर देण्यासाठी या निवडणुकीत माजी मंत्री वीरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांचा पुढाकार असून तरुणांचा सुद्धा उत्साह मोठा असल्याचे सांगितले.
माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आतापर्यंत आपण एक डझन पेक्षा अधिक निवडणुकीची तिकिटे आणली आहेत. काँग्रेसचे नेते मंडळी व कार्यकर्ते आपल्याबरोबरच असून तिकिटासाठी कोणतीच अडचण नाही आपला लढा भाजपाबरोबर असून कार्यकर्त्यांनी अफवाना बळी न पडता बेरजेचे राजकारण करण्याचे आवाहन केले.
लक्ष्मण चिंगळे यांनी, कार्यकर्त्यांनी बुथनिहाय काम केल्यास आगामी निवडणुकीत काकासाहेब पाटील विजयी होणार आहेत. गत वेळेपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष देण्याचे आवाहन केले. यावेळी अण्णासाहेब हवले, राजू खिचडे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, युवा उद्योजक रोहन साळवे, बेडकीहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, शंकरदादा पाटील, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, माजी सभापती अल्लाबक्ष बागवान, विश्वास पाटील, किरण कोकरे, बाबा पाटील, निकु पाटील, नवनाथ चव्हाण, बाबुराव खोत, शशी पाटील, सिताराम पाटील, महारुद्र स्वामी, अन्वर हुकेरी, रमेश भोईटे, शरीफ बेपारी, असलम शिकलगार, अब्बास फरास, बबन चौगुले, मोहम्मद हुसेन पटेल, संभाजी गायकवाड, अशोक लाखे, पांडुरंग पाटील, श्रीनिवास संकपाळ, परशराम भोईटे, सचिन लोकरे, राजू पाटील, प्रकाश पाटील, भीमगोंडा येडूरे, पोपट मगदूम, अशोक पाटील, युवराज पोळ, सुधाकर सोनारकर, बाबासाहेब कोकाटे, दादासाहेब पाटील यांच्यासह निपाणी मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *