हंचिनाळ येथील व्याख्यानमालेत दिला जातोय दीपप्रज्वलनाचा मान विधवेला!
हंचिनाळ (वार्ताहर) : आजच्या जगात शाळेच्या इमारतीची उंची वाढली पण दर्जा बाबत विचार होणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने अधिकाधिक व दर्जेदार शिक्षण घेतले पाहिजे. पण शिक्षणाबरोबर केवळ सुशिक्षित होण्यापेक्षा सुसंस्कारित बनून समाजाचे ऋण फेडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गडहिंग्लजचे प्राध्यापक अनिल पाटील यांनी केले.
येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात शारदीय उत्सवानिमित्त मागील पाच दिवसापासून व्याख्यानाला सुरू आहे पाचव्या दिवसाचे व्याख्यानमालयात मागील पाच दिवसाप्रमाणेच. दररोज किमान एकातरी विधवा महिलेला दिपप्रज्वलनांचा सन्मान देऊन महिलांना खऱ्या अर्थाने दुर्गा मातेचा सन्मान सुरू आहे.
पाटील पुढे म्हणाले, शिक्षण केवळ शाळेतच शिकवले जात नाही तर प्रथम आई वडील व समाज हेच खरे गुरु आहेत प्रत्येक व्यक्तीने फक्त शिकून पदव्या घेण्यापेक्षा आई वडील ज्येष्ठांचा आदर राखला पाहिजे व समाजाचे ऋण फेडण्यासाठी झाले पाहिजे, असे सांगितले.
या कार्यक्रमाला आर. एल. चौगुले ग्रामपंचायत सदस्य एम. वाय. हवालदार, माजी उपाध्यक्ष कुमार गुरव, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष बाबासाहेब अकोळे, भक्ती योगाश्रम मठ समितीचे अध्यक्ष अनिल मंगसुळे, गणेश देवस्थान समितीचे अध्यक्ष मधुकर चौगुले, अरुण पाटील, सातया स्वामी, मलगोंडा सुतार, ज्योतीराम कानडे, आनंदा कानडे, सुमन सुतार विमल चौगुले, रावसाहेब नलवडे, महादेव नलवडे, राजश्री संकपाळ, अरुण नलवडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व पाहुण्यांचा परिचय संतोष संकपाळ यांनी करून दिला. सूत्रसंचालन विलास गायकवाड तर मारुती जाधव यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta