Wednesday , December 10 2025
Breaking News

स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधीजींसह क्रांतीकारकांनी मोठे योगदान

Spread the love

मंत्री शशिकला जोल्ले :निपाणीत गांधी पुतळ्याचे अनावरण
निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधीजीसह क्रांतीकारकांनी मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी निपाणी येथे येऊन केलेले मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्या जागेला गांधी चौक असे नाव दिले होते. त्यानंतर गांधी पुतळा करणे आवश्यक असताना केवळ चबुतराचा होता. नगरपालिका सभागृहासह नागरिकांच्या मागणीनुसार आता पुतळा बसविला आहे. जोल्ले दाम्पत्यांच्या हस्ते त्याचे अनावरण होणे हा सुवर्ण योगायोग आहे. यापुढे काळातही निपाणी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली. रविवारी येथील गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण करून त्या बोलत होत्या.
प्रारंभी जोल्ले दाम्पत्यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगरसेविका सोनल कोठडीया यांनी स्वागत केले.
मंत्री जोल्ले म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार ग्रामीण भाग समस्या मुक्त करण्यासाठी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी, मतदारसंघात १५० किलोमीटर पदयात्रा काढून जाणून घेतले आहेत त्यानुसार त्याची पूर्तता केली जात आहे.
गांधी पुतळ्याचे स्वप्न साकार करण्यासह सरलाबाईच्या दवाखाना जोल्ले ग्रुप तर्फे सुरू करून सर्वसामान्यांना न्याय दिला आहे. आतापर्यंत ३० महिलांची प्रसूती झाली असून सहा हजार पेक्षा अधिक रुग्णावर मोफत उपचार केले आहेत. धर्मादाय खात्याकडून मतदारसंघात सर्वच मंदिरांना निधी उपलब्ध करून दिला आहे आता ब्रह्माकुमारी कार्यालयासाठी सुद्धा दहा लाखाचा प्रस्ताव असून लवकरच त्याची पूर्तता होणार आहे.
खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, महात्मा गांधी यांचा पुतळा बसविण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. मुजराई खात्याकडून मंदिरे व इतर कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. पुतळ्याचे अनावरण झाले असून लवकरच परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मिळालेल्या संधीतील वेळ वाया न घालवता मतदार संघातील नागरिकांनी सांगितलेली सर्वच कामे पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी, मंत्री आणि खासदारांच्या नेतृत्वाखाली निपाणी शहरात ८०० कोटीची विकास कामे मंजूर झाले आहेत. आतापर्यंत २०० कोटीची कामे पूर्ण झाली आहेत. ‘सबका साथ सबका विकास’ या धोरणानुसार शहरात काम सुरू असून यापुढे काळात शहराचा कायापालट करण्यासाठी सांगितले.
कार्यक्रमास यावेळी हालशुगर अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, संचालक पप्पू पाटील, आशिषभाई शाह, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष अभय मानवी, कार्यक्रमास नगराध्यक्ष उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, नगरसेवक संतोष सांगावकर, दत्ता जोत्रे, नगरसेविका आशा टवळे, सुजाता कदम, उपासना गारवे, अरुणा मुदकुडे, रंजना इंगवले, प्रणव मानवी, रवींद्र कदम अमित रणदिवे दिलीप उदय शिंदे, दीपक माने, पिंटू बागडे, अण्णासाहेब कुराडे, टी. एन. कागे, सुरेश शेट्टी, प्रताप पट्टणशेट्टी, दयानंद कोठीवाले, राजेश कोठडीया, दादाराजे देसाई निपाणकर सरकार, विजय मेत्रानी, सुभाष मेहता, विकास वासुदेव, दिलीप चव्हाण, सुनील कांबळे, सुबोधभाई शाह, राजन व्हदडी, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————————-
स्वच्छतेची प्रतिज्ञा
निपाणी शहर स्वच्छ सुंदर शहर बनवण्यासाठी नगरपालिकेतील कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना साथ देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवण्यासह ओला आणि सुका कचरा घंटागाडीला देऊन सहकार्य करावे. याबाबतची प्रतिज्ञा मंत्री शशिकला जोल्ले यांनी उपस्थितांना यांना दिली.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *