देवचंदमध्ये गांधी जयंती
निपाणी (वार्ता) : समाजाच्या उन्नतीवर देशाची उन्नती अवलंबून असते. समाजाचा विकास होण्यासाठी महात्मा गांधी यांचे विचार आवश्यक आहेत. सत्य अहिंसा, स्वच्छता यांचा अवलंब केल्यास समाज प्रगतीपथाच्या मार्गावर जाईल, असे विचार तृप्ती भाभी शाह त्यांनी व्यक्त केले. अर्जुन नगर (ता. कागल) देवचंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेना योजना -2 तर्फे आयोजित गांधी जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
तृप्ती भाभी शाह म्हणाल्या, विद्यार्थ्यानी आदर्श व्यक्तीमत्व घडवत असताना महात्मा गांधीजीचे आदर्शवत विचार डोळ्यासमोर ठेवावेत. गांधीजी यांनी सेवा हाच धर्म मानून आपले जीवन व्यतीत केले. विद्यार्थ्यानीही समाजातील उपेक्षित घटकाची सेवा करावी. स्वच्छतेला विशेष महत्व द्यावे. आपला परिसर स्वच्छ ठेवून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी श्रमदानासह वृक्षारोपन, परिसर स्वच्छता करावी यामुळे स्वच्छतेचे महत्व समजते. राष्ट्रीय सेवा योजना व म. गांधीजीचे विचार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाज प्रगत होण्यासाठी तरुणवर्ग जागृत होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून म. गांधीजीचे विचार रुजवले जातात. मा. गाधीजीचे ’खेड्याकडे परत चला’ हे विचार राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे रुजवले जात आहेत.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राहूल घरेकरी यांनी प्रास्ताविक केले. राणी सोकासने यांनी सूत्रसंचाल नकेले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. पी. पी. शाह, उपप्राचार्य एस. जी. कागवाडे, पर्यवेक्षक ए. डी. पवार, ए. ए. कुराडे, प्रा. टी. ए. पाटील यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. अर्चना पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta