
रस्ता कामाची चौकशी करा : माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार- वडर
निपाणी (वार्ता) : बोरगाव -बेडकीहाळ, बोरगाव -आयको या आंतरराज्य मार्गांची गेल्या अनेक महिन्यापासून दुरावस्था झाली आहे. दोन्ही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांची स्थिती एवढी मोठी आहे की त्यांना खड्डे म्हणावे की रस्ताच नाही, अशी अवस्था झाली आहे. याबाबत नागरिकांनी आवाज उठवले असता लवकरच खड्डे मोजण्याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र खड्ड्यांचे साम्राज्य काही केल्या कमी न झाल्याने गेली गणेश चतुर्थी आली दिवाळी, पण खड्डे जैसे थे!. म्हणण्याची वेळ आली आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्तीने केल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार-वडर यांनी केली आहे.
बोरगाव बेडकीहाळ पर्यंतच्या रस्त्यावर सुमारे ६० ते ७० हून अधिक मोठमोठे खड्डे पडले आहेत. खुल्या रस्त्यावर खड्ड्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाले आही. अनेकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था बनली आहे. खड्डे चुकवताना अपघात घडत आहेत. बोरगाव आयको मार्गावर सुद्धा मोठमोठे खड्डे पडले आहेत. जवळच वस्त्र नगरी असल्याने कर्नाटक गोवा व महाराष्ट्र राज्यातील वाहनांची संख्या या ठिकाणी मोठी असते. दररोज हजारांच्या पटीत वाहने या रस्त्यावरून चाहने धावतात. रस्त्यावर दररोज आपघात घडत आहेत. या मार्गाचे डागडुज्जी करावी अशी गेल्या अनेक वर्षापासून नागणी होत आहे. पण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी ही या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याने रस्ता अधिकच खराब होत चालला आहे.
बोरगाव-बेडकीहाळ व बोरगाव हा रस्ता सीमा भागातील महत्त्वाचा रस्ता आहे. विद्यार्थी, प्रवासी, मालवाहतूक, कामगार वर्ग या रस्त्यावरून ये जा करीत असतो. पण खराब रस्त्यामुळे सर्वांना त्रास होत आहे. अनेक महिन्यापासून रस्ते खराब आहेत. त्यामुळे कामगारांसह प्रवासी येणाऱ्या लोकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. सध्या गेले दोन दिवसापासून परिसरात पाऊस पडत आहे. यामुळे खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. खड्ड्यांचा अंदाज समजत नसल्याने अपघात वाढत आहेत. खड्डा चुकीवताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.तर दुचाकी स्वारांना अपघातास समोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनल्याचे वाहनधारक व प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.
संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी याचे गांभीर्यता ओळखून लवकरात लवकरच रस्त्याची डागडुजी करावी. अन्यथा या ठिकाणी उपोषण करावे लागणार असा इशाराही प्रवासी व नागरिकांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta