आमदार प्रकाश हुक्केरी यांचे प्रयत्न : १ कोटीचा निधी मंजूर
निपाणी (वार्ता) : जनवाड – सदलगा रस्ता क्रॉस ते थळोबा मंदिर पर्यंतच्या रस्ता कामासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून या शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष कुमार मुधाळे यांच्यासह अन्न मान्यवरांच्या उपस्थितीत आम प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते पार पडला.
महादेव स्वामींच्या कृपा आशीर्वादाने मला आमदार, मंत्री, खासदार, आता पुन्हा विधान परिषद सदस्य होण्याची संधी मिळाली. त्यामुळे जनवाड गावावर माझे विशेष असे प्रेम आहे. जनवाड गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध खात्याकडून ९ कोटी ५७ लाखांचा भरीव असा निधी मंजूर झाले आहेत. त्याचबरोबर लक्ष्मी मंदिर रस्ता ते जनवाड शाळा रस्ता कामासाठी २ कोटी मंजूर झाले असून टेंडर पास झाला आहे. त्याचे हि कामकाज लवकरच सुरू करणार असल्याचे माजी मंत्री व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले.
ते जनवाड येथे आयोजित रस्ता शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी शेतकरी व ग्रामस्थांकडून विविध समस्याही जाणून घेतल्या. त्याही लवकरच पूर्तता करण्याची ग्वाही दिली.
आमदार प्रकाश हुक्केरी यांनी, जनवाड गावात शेतकरी कुटुंब अधिक आहेत. यामुळे विशेषता रस्त्यांसाठी आपण भरिव अशी निधी मंजूर केली आहे. सदलगा बोरगाव रस्त्यापासून जनवाड गाव ते बोरगाव पर्यंतच्या रस्ता सुधारण्यासाठी २ कोटी ९७ लाख, सदलगा बोरगाव रस्त्यापासून जनवाड येथे कन्वर्टर (बॉक्स) निर्माण करणे यासाठी १ कोटी, बोरगाव सदलगा रस्त्यापासून चांदपीर रस्ता ते जनवाड जैनमळा पऱ्यांच्या रस्ता सुधारण्यासाठी २ कोटी, जनवाड गावापासून दूधगंगा नदीपर्यंतच्या रस्ता सुधारण्यासाठी १ कोटी, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा कामासाठी ८० लाख, जनवाड या ठिकाणी कन्वर्टर बॉक्स निर्माण करण्यासाठी ३ कोटी, परमपूज्य महादेव स्वामी धर्मर मठाच्या समदाय भवन बांधकामासाठी २० लाख, व दूधगंगा नदी येथे नदीघाट बांधकामासाठी ६० लाख, असे एकूण ९ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामातून काही कामे पूर्णत्वास आली आहेत.तर काही कामांना लवकरच प्रारंभ होणार आहे. जनवार पानंद रस्त्यासाठीही निधी मंजूर करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची समस्या जाणून घेऊन या समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. जनवाड गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण आजपर्यंत प्रामाणिकपणे कार्य केले आहे. कार्यकर्त्यांनी एकजुटीने राहून पक्ष वाढीसाठी कार्य करावे असे शेवटी प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष कुमार मुधाळे, ग्रामपंचायत सदस्य ज्योतिबा मोकाशी, सनातन मगदूम, धोंडीराम पाटील, रामचंद्र चौगुले, सिद्धू मोकाशी, कृष्णगौडा पाटील, अण्णासो घाटगे, धोंडीराम पाटील, बाळासाहेब पाटील, लक्ष्मण घाटगे, रामचंद्र मोकाशी, पप्पू पाटील, पिरगोंडा चौगुले, प्रभाकर केरुरे, धर्मर मठ कमिटीचे अध्यक्ष पीरगोंडा मगदूम, उपाध्यक्ष बाबासो घाटगे, सदाशिव पाटील, शिवाजी कांबळे, सुरेश कोरे, रामलिंग मुधाळे, श्रीकांत शांडगे, आण्णासाहेब घाटगे यांच्यासह गावातील नागरिक, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta