बेळगाव : गांधीनगर येथील एका नॉन मॅट्रिक तोतया डॉक्टरावर आरोग्य खात्याने कारवाई करून दवाखान्याला टाळे ठोकण्यासह कणबर्गी येथील आणखी एका दवाखान्यावर काल कारवाई केली आहे.
श्री सिद्धेश्वर क्लिनिक या नावाने सुरू करण्यात आलेल्या दवाखान्यात रुग्णांना मोठ्या प्रमाणात लोपॅथी औषधे देण्यात येत होती. त्यामुळे आरोग्य खात्याने डॉ. लक्ष्मण मालाई तयांच्याच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकार्याकडे तक्रार केली आहे.
बीएचएमएससी पदवी असून देखील कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर क्लिनिकमध्ये रुग्णांवर डॉ. लक्ष्मण मालाई हे लोपॅथी उपचार करीत आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याला मिळाली होती.
त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी नोडल अधिकारी डॉ. एम. व्ही. किड्सण्णावर व त्यांच्या सहकार्यांनी छापा टाकून ही कारवाई केली. यावेळी दवाखान्यामध्ये आढळून आलेला औषधसाठा देखील जप्त केला. त्याचबरोबर दवाखान्यालाही टाळे ठोकले आहे. आरोग्य खात्याने केलेल्या कारवाईमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta