विविध धार्मिक कार्यक्रम : शर्यती, स्पर्धेचे आयोजन
कोगनोळी : येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रेच्या मुख्य दिवशी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मानकरी, पुजारी, धनगर बांधव यांच्या उपस्थितीत सकाळी सात व संध्याकाळी सात वाजता आरती करण्यात आली.
मंगळवार तारीख 18 रोजी माजी मंत्री वीरकुमार पाटील व सी. के. पाटील यांचे मानाचे तोरण अर्पण करून कर बांधून या यात्रेला सुरुवात झाली. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमासह रोज रात्री ढोल जागर, वालंग, पालखी प्रदर्शना आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
यात्रेनिमित्त मंदिराची रंगरंगोटी करून घेण्यात आली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
मंदिर परिसरात खेळणी, पाळणे, मेवा, मिठाई, नारळ, साखर, कापूर, आईस्क्रीम, भेळ, हॉटेल आदीची दुकाने थाटण्यात आली आहेत.
गुरुवार तारीख 20 रोजी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. रात्री ढोल जागर वालंग, पालखी प्रदक्षिणा पहाटे कृष्णात ढोणे महाराज यांची पहिली भाकणूक झाली.
शुक्रवार तारीख 21 रोजी सकाळी नऊ वाजता भाजप पुरस्कृत जनरल बैलगाडी व इतर शर्यती संपन्न झाल्या. दुपारी दोन वाजता बापूसाहेब पीडाप पाटील व बाळासाहेब बाळीकाई यांच्या मानाच्या बैलजोडीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून हालसिद्धनाथ नगर येथील बिरदेव मंदिरात आणण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
शनिवार तारीख 22 रोजी सकाळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, सकाळी नऊ वाजता बिरदेव यात्रा कमिटी यांच्या वतीने विविध शर्यती होणार आहेत.
मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आणि कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कोगनोळी पोलीस स्टेशनचे एस आय कंभार, राजू गोरखनावर, शिवप्रसाद व व्हाईट आर्मीच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta