चिकोडी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे : पत्रकार बैठकीत माहिती
निपाणी (वार्ता) : चिकोडी जिल्हा मतदार संघातील रायबाग विधानसभा मतदारसंघात १४ पैकी १३ जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. तर एका जागेवर भाजपला समाधान मानावे लागले, अशी माहिती चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी निपाणी विश्रामधाम येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
कुडची विधानसभा मतदारसंघातील १ जागा भाजपाला मिळाली आहे. जलालपूर’ भिरडी’ भेंडवाड’ हंदीगुंद, मोळे, हुन्नरगी या ग्रामपंचायतीमध्ये एकूण १७ जागेसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये १२ जागांची निवडणूक ही मुदतपूर्व निवडणूक झाली. त्यापैकी १४ जागेवरती काँग्रेस पुरस्कृत विजय मिळवला आहे. तर भाजपला फक्त २ जागेवरच समाधान मानावे लागले. तर एका जागेवर अपक्ष विजयी उमेदवार विजयी झाले आहेत.
देशात राज्यात जिल्ह्यात भाजप सरकार असतानाही त्यांना केवळ दोन जागेवर समाधान मानावे लागले. तर एका जागेवर अपक्षांना विजय मिळवला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येणार हे निर्विवाद सत्य आहे. राज्यातील जनता काँग्रेसच्या बाजूने उभे आहेत. हे निश्चित झालेले आहे. या विजयामुळे संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेसचे वातावरण उत्साहवर्धक होऊन कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. भविष्यात काँग्रेसचे सर्व नेते कार्यकर्ते एकजुटीने पक्ष बांधणे व जनसंपर्क वाढवून पुढील सर्व निवडणुका जिंकण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत.राहुल गांधीनी कामाला सुरुवात केलेली आहे. जिल्ह्यामध्ये सर्व निवडूका कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते सिद्धरामय यांनी सर्व सदस्यांचे अभिनंदन केल्याचे चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी स्पष्ट केले.
Belgaum Varta Belgaum Varta