Saturday , November 23 2024
Breaking News

बोरगाव कृषी संघाच्या पदाधिकाऱ्यांची जळगाव जैन इरिगेशनला भेट

Spread the love
शेतकऱ्यांनी जाणून घेतले पाण्याचे महत्व : उत्तम पाटील यांचा पुढाकार
निपाणी (वार्ता) : इस्रायलच्या धर्तीवर बोरगाव परिसरातील शेतकरीही शेती करावेत. त्यासाठी त्यांना लागणाऱ्या विविध कृषी क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची  माहिती मिळावी, यासाठी बोरगाव प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव येथील जैन ड्रीप इरिगेशनच्या कारखान्याला भेट दिली. त्या ठिकाणी पिकवलेली शेती, शेती विषयक सर्व माहिती घेतली.संघाचे  अध्यक्ष उत्तम पाटील यांचे नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी जळगाव येथे भेट दिली.
जैन इरिगेशनचे अनिल जैन यांनी  स्वागत करून, शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हायचा झाल्यास त्यांनी भविष्यात विविध आधुनिक पद्धती अवलंब केले पाहिजेत. शेती हा एकच शाश्वत व्यवसाय आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या शेतात कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. जैन इरिगेशन माध्यमातून कोणत्या जमिनीस कोणत्या पद्धतीने पाणी द्यावे लागते, व कशा पद्धतीने पाणी द्यावे लागते आणि त्यासाठी लागणारी विविध उपकरणे ही सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत असल्याचे सांगितले.
 बोरगाव व परिसरातील शेतकऱ्यांचाही आर्थिक विकास व्हावा व शेतकऱ्यांना विविध ज्ञान मिळावे, यासाठी कृषी संघाच्या माध्यमातून जैन ड्रीप इरिगेशन व कृषी संघ यांच्या वतीने विशेष असे मार्गदर्शन मिळणार आहे. यासाठी  कृषी संघाने जैन इरिगेशनच्या सर्वच उपक्रमांची माहिती घेतली आहे. भेटीमुळे भविष्यात बोरगाव येथील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले.
 उत्तम पाटील यांनी, जळगाव येथे सुमारे ३ हजार एकरवर जैन इरिगेशनचे प्लांट व २०७५ एकरवर कारखाना आहे. शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून इस्राईलच्या धर्तीवर या ठिकाणी शेती केली जाते. सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी करणे गरजेचे आहे. शेतकरी जगला तरच देशातील सर्व घटक जगत असतात. यासाठी आपण आपल्या कृषी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना हाती घेतले आहे. जैन इरिगेशनच्या माध्यमातून आपण बोरगाव परिसरात विविध योजना हाती घेऊन शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्याचा  प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
बेळगाव विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल साळवी यांनी उत्तम पाटील यांचा सत्कार करून शेतकऱ्यांच्या विकासासाठी हाती घेतलेल्या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातपुते, संचालक राजेंद्र पाटील, प्रदीप माळी, राजेंद्र ऐदमाळे, सुमित रोड्ड, सुरेश बंकापुरे, दर्शन पाटील, प्रवीण पाटील, तैमूर मुजावर, राजू गजरे, मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी रावसाहेब चौगुले, निरंजन पाटील सरकार, यांच्यासह कृषी संघाचे पदाधिकारी व जैन इरिगेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी

Spread the love  बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *