तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड येथे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ऑक्सिजन प्लांटच्या पायाभरणीचा शुभारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
गेल्या महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव चंदगड तालुक्यात वाढत चालला होता. ऑक्सिजन बेड व ऑक्सिजन सिलेंडरच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल होत. याचा तात्काळ विचार करून आमदार राजेश पाटील यांनी आपल्या आमदार फंडातून 50 लाख रुपये ऑक्सिजन प्लांटसाठी मंजूर करून दिले होते. तसेच या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा केला होता. आज या ऑक्सिजन प्लॉटची प्रत्यक्षात पायाभरणी करण्यात आली. लवकरच या ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण होणार असून भविष्यात तालुक्याला त्याचा उपयोग होणार आहे.
यावेळी नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, सभापती अनंत कांबळे. तहसीलदार विनोद नरवरे सो, बीडीओ चंद्रकांत बोडरे, डॉ. खोत, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.