Monday , December 15 2025
Breaking News

LOCAL NEWS

कोविड निर्बंध शिथील करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून संकेत

उद्याच्या बैठकीत तज्ञांशी करणार चर्चा बंगळूर (वार्ता) : कोविड-19 प्रतिबंध शिथिल करण्याचे संकेत देताना, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी सांगितले की, संसर्ग येतो आणि जातो अशी आता सामान्य भावना झाली आहे. फ्लूसारखी परिस्थिती आहे. त्यामुळे कमी लोकांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता आहे. तथापि, बोम्मई म्हणाले की, तज्ञांशी बोलल्यानंतर सरकार नाईट कर्फ्यू आणि …

Read More »

विकेंड कर्फ्यूचे भवितव्य ठरणार शुक्रवारी

मंत्री अशोक यांची बैठकीनंतर माहिती : संपूर्ण लॉकडाऊन नाही बंगळूर (वार्ता) : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकात विकेंड (शनिवार व रविवार) कर्फ्यू सुरू ठेवायचा की नाही याचा निर्णय घेण्यासाठी शुक्रवारपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला, मात्र सरकारने पूर्ण लॉकडाऊनची कोणतीही शक्यता नाकारली. कोविड-19 तांत्रिक सल्लागार समितीसोबत बोम्मई यांच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती …

Read More »

सीमाभागातील मराठी भाषिकांचा आधारवड हरपला; प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

बेळगाव (वार्ता) : सीमाभागातील मराठी भाषिकांचे आधारवड, पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्याने गेल्या …

Read More »

मराठी अस्मितेची ज्योत विझणार नाही!

  म. ए. समिती-शिवसेनेतर्फे बेळगावात हुतात्म्यांना अभिवादन बेळगाव (वार्ता) : वादग्रस्त सीमाभागाचा महाराष्ट्रात समावेश करण्याच्या मागणीसाठी 17 जानेवारी 1956 रोजी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना आज बेळगावात अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. मराठी अस्मितेची ज्योत विझणार नाही असा ठाम निर्धारच या निमित्ताने करण्यात आला. रामदेव गल्लीतील हुतात्मा स्मारकात सोमवारी सकाळी …

Read More »

राज्यात 200 स्टार्टअपना प्रत्येकी 50 लाख मूल निधी

मंत्री अश्वत्थ नारायण : देशात पहिलाच उपक्रम, ’स्टार्टअप दिना’चे आयोजन बंगळूर (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, अतिरिक्त 75 नवोद्यमींसह राज्यात एकूण 200 नवोद्यमीना यावर्षी जास्तीत जास्त 50 लाख रुपये मूल निधी (सीड फंड) देण्यात येईल, असे आयटी, बीटी आणि कौशल्य विकास मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण …

Read More »

वॉर्ड क्रमांक 50 मधील नगरसेविकेची नागरिकांवरच अरेरावी

बेळगाव (वार्ता) : सध्या बेळगाव शहरात पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या अनुषंगाने समाजसेविका माधुरी जाधव यांनी स्थानिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून वडगाव भागातील नागरिकांच्या समस्या शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वॉर्ड क्रमांक 50 मधील आनंदनगर दुसरा क्रॉस येथील समिती कार्यकर्त्या शिवानी पाटील तसेच परिसरातील महिलांशी संपर्क साधून पाण्याच्या समस्येबाबत चर्चा करत …

Read More »

रुबेलाचे इंजेक्शन दिल्यामुळे 3 बाळांचा मृत्यू

बेळगाव : रुबेलाचे इंजेक्शन दिल्यानंतर तिघा बाळांचा मृत्यू झाल्याची घटना बेळगावात घडली आहे. रामदुर्ग तालुक्यातील बोचबाळ गावातील पवित्र हुलगुर (13 महिने), मधु उमेश कुरगुंडी (14 महिने) आणि चेतन पुजारी (15 महिने) यांचा मृत्यू झालायं. तीन दिवसांपूर्वी चौघा बाळांना बिम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पण आता तिघांचा मृत्यू झाला आहे. बालकांमध्ये …

Read More »

इयत्ता 1 ते 9 वीच्या शाळा उद्यापासून पुन्हा सुरू

बेळगाव (वार्ता) : 11 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत इयत्ता 1 ते 9 वीच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले होते. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आढावा घेऊन या आदेशात बदल करण्यात आला आणि इयत्ता 1 ते 9 वी साठी सोमवार 17 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. अथणी …

Read More »

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा

बेळगाव (वार्ता) : छत्रपती संभाजी महाराज यांचा 342 राज्याभिषेक दिनानिमित्त धर्मवीर संभाजीराजे उत्सव व धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समिती यांच्यावतीने साजरा करण्यात आला. यावेळी संभाजी महाराज यांच्या मूर्तीला लोकप्रिय आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालण्यात आला. तसेच पुजा करण्यात आली. धर्मवीर संभाजीराजे उत्सव व धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समिती बेळगाव यांच्यावतीने …

Read More »

एपीएमसीचे माजी अध्यक्ष परशराम बेडका यांचे निधन

बेळगाव (वार्ता) : म. ए. समितीचे माजी नगरसेवक आणि एपीएमसी माजी अध्यक्ष, कलमेश्वर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष परशराम बेडका वय 60 वर्षे रा. बसवण कुडची बेळगाव यांचे शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रात्री साडे नऊ वाजता त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. …

Read More »