Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

कडोलीतील शेतकर्‍याची आत्महत्या

बेळगाव : कडोली (ता. जि. बेळगाव) येथील मायण्णा गल्लीतील सुप्रसिद्ध शेतकरी आणि गावातील प्रसिद्ध देसाई कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती कल्लाप्पा उर्फ कल्लण्णा सिद्धाप्पा देसाई यांनी आज शनिवारी सकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने 68 वर्षीय कल्लाप्पा यांनी आत्महत्या केल्याचे समजते. देसाई कुटुंबामध्ये गेल्या आठवड्याभरापासून …

Read More »

साखरपुडा संपवून घरी परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

धाडवाड तालुक्यातील बाड गावाजवळील घटना अंकली : लग्नसमारंभाच्या आदल्या दिवशी साखरपुडा संपवून घरी परतत असणार्‍या नातेवाईकांच्या चारचाकी वाहनावरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि चारचाकी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 10 गंभीर जखमी झालेले आहे. या चारचाकीतून 21 जण प्रवास करत होते. ही घटना …

Read More »

अनुसूचित जाती-जमाती राज्य विकास परिषदेची बैठक; एससीएसटी समाजाच्या विकासासाठी २८ हजार कोटींची मंजुरी

बेंगळुरू : मागील वर्षी एससीपी, टीएसपी अनुदान कोणत्या विभाग किती देण्यात आले आहे? बचत किती आहे? याची पडताळणी करून त्यात काही बदल करून एकूण २८ हजार कोटी रुपयांचे अनुदान एससीएसटी समाजाला देण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. आज बेंगळुरूमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

विधान परिषदेसाठी हनुमंत निरानी यांचा अर्ज दाखल

बेळगाव : वायव्य पदवीधर मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. भाजपचे उमेदवार हनुमंत निरानी यांनी आज या निवडणुकीसाठी आपला सांकेतिक उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. हनुमंत निरानी याआधी एमएलसी होते. आता दुसऱ्यांदा …

Read More »

मान्सूनपूर्व अतिवृष्टीत कर्नाटकात ९ जणांचा मृत्यू

मंत्री अशोक; बेळगावसह चार ठिकाणी एनडीआरएफची पथके बंगळूर : कर्नाटकात मान्सूनपूर्व पावसामुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगून पावसाच्या आपत्ती निवारणासाठी सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला (एनडीआरएफ) ची चार पथके तैनात करणार आहे, असे महसूल मंत्री आर. अशोक यांनी सांगितले. दरम्यान, कांही भागात पवसाचा जोर कमी झाला असला तरी अद्यापही धोका …

Read More »

जैनधर्म तत्वज्ञान जीवनाला दिशादायक

युवा नेते श्रीनिवास पाटील : शेडबाळला पंचकल्याण महोत्सवात सहभाग अथणी : अहिंंसा परमोधर्म यासह जैन धर्मातील तत्वज्ञान मानवी आयुष्याला दिशा देणारे आहे, असे मत भाजपचे युवा नेते श्रीनिवास श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले. शेडबाळ येथे श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्यावतीने आयोजित केलेल्या पंचकल्याण महोत्सवात श्रीनिवास पाटील सहभागी झाले होते. …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतचे येळ्ळूर-वडगाव रस्त्याच्या ब्रिजसाठी निवेदन

बेळगाव : बायपास रस्त्याचे काम जोमाने सुरु असून येळ्ळूर वडगांव रस्त्यावरून जाणाऱ्या ब्रिजची उंची व रुंदी वाढून देण्याबाबत निवेदन देण्यात आले. येळ्ळूर- वडगाव रस्त्यावरून जाणारे ब्रिजची उंची ही 4 मीटर (13 फूट) आहे व रुंदी 12 मीटर (39 फूट) आहे. हे समजताच येळ्ळूर ग्राम पंचायतीने तातडीने भेट घेऊन याबद्दल रहदारी …

Read More »

कर्नाटकातील लोहखनिज निर्यातीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये लोहखनिजाचे उत्खनन केलेल्या कंपन्यांना त्यांचा माल विदेशात निर्यात करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. राज्यातील बेल्लारी, चित्रदुर्ग आणि तुमकुरु या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने लोहखनिजाचे उत्खनन करण्यात आलेले आहे. संबंधित प्रशासकीय विभागांनी घालून दिलेल्या अटी, शर्थीचे पालन करीत संबंधित कंपन्या लोहखनिजाची निर्यात करू शकतात, असे सरन्यायाधीश एन. व्ही. …

Read More »

वाढीव आरक्षणासाठी एससीएसटी समाजाचे आंदोलन

बेळगाव : एससीएसटी समाजाला वाढीव आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी कर्नाटक स्वाभिमानी अनुसूचित जाती जमाती आरक्षण वाढ आंदोलक क्रिया समितीच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले होते. येत्या 15 दिवसात वाढीव आरक्षण न मिल्यास सरकार पडेल, असा इशाराही आंदोलकांनी दिला. एससीएसटी समाजाला 3 टक्के आरक्षण देण्यात येत आहे. हे आरक्षण 7.5 टक्के इतके …

Read More »

कॅनडा संसदेत कन्नडमध्ये भाषण

बेंगळुर : मूळचे कर्नाटकातील चंद्र आर्य यांनी कॅनडा संसदेत कन्नड भाषेत भाषण केले आहे. कन्नड संस्कृती आणि मातृभाषेचा अभिमान बाळगत त्यांनी आपले मनोगत कन्नड भाषेत कॅनडा येथील संसदेत मांडले आहे. कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील शिरा या तालुक्यातील द्वाराळू या गावातील चंद्र आर्य हे कॅनडास्थित आहेत. कॅनडामधील संसदेत त्यांनी आपल्या मातृभाषेतून म्हणजेच …

Read More »