बेळगाव (वार्ता) : कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळ उत्तर मतदारसंघातील घोषित सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झोपडपट्टीवासीयांसाठी घोषणापत्र वितरणाचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला. शहरात आयोजित सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बेळगाव उत्तरचे आमदार अॅड. अनिल बेनके यांच्या हस्ते हा घोषणा पत्र वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना …
Read More »LOCAL NEWS
ग्रामीण भागातील विकासाला प्रथम प्राधान्य : विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी
बेळगाव (वार्ता) : बेळगाव ग्रामीण भागातील विकासाला सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल, असे विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले. बेळगाव तालुका लवादाच्या मंगळवारी झालेल्या प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण क्षेत्रात विकास होणे गरजेचे आहे. विकासकामे पूर्ण करण्यासाठी कर्मचार्यांनी सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे यावेळी उपस्थित …
Read More »‘जय किसान’बाबत चौकशी करून सरकारला अहवाल : जिल्हाधिकारी
बेळगाव (वार्ता) : गांधीनगरनजीक सुरू करण्यात आलेले जय किसान होलसेल भाजी मार्केटच्या बाबतीत ज्या तक्रारी आहेत त्याची चौकशी करून सरकारला अहवाल पाठविला जाईल आणि तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्पष्ट केले. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज मंगळवारी झालेल्या खाजगी भाजी मार्केट आणि …
Read More »खासगी भाजीमार्केट बंद करण्यासाठी एल्गार
बेळगाव (वार्ता) : बेळगावात बेकायदेशीररीत्या उभारलेले खासगी जयकिसान होलसेल भाजी मार्केट बंद करावे, त्याला बेकायदा परवानगी देणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी या मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटना आणि भाजी व्यापार्यांनी आज एपीएमसीसमोर भव्य आंदोलन केले. खासगी होलसेल भाजीमार्केटच्या माध्यमातून बेकायदा खासगी एपीएमसी सुरु करण्यास परवानगी दिल्याचे संतप्त पडसाद बेळगावात उमटत आहेत. त्याविरोधात …
Read More »प्रांताधिकारी कार्यालयावर जप्ती!
बेळगाव (वार्ता) : शेतकर्यांची जमीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर कार्यालयासाठी ताब्यात घेऊन तब्बल 41 वर्षे झाली तरी संबंधित शेतकर्याला नुकसान भरपाई न दिल्यामुळे आज मंगळवारी न्यायालयाने प्रांताधिकारी कार्यालयावर जप्ती आदेश बजावला. त्यामुळे प्रांताधिकारी कार्यालयातील सर्व साहित्य आज रस्त्यावर आले होते. न्यायालयाच्या जप्ती आदेशानुसार बेळगाव प्रांताधिकारी कार्यालयातील सर्व साहित्य आज …
Read More »नाईट कर्फ्यू, विकेंड कर्फ्यूचा जानेवारी अखेरपर्यंत विस्तार
कोविड नियंत्रणासाठी निर्बंध; लॉकडाऊनचे भवितव्य गुरुवारी बंगळूर (वार्ता) : कर्नाटक सरकारने मंगळवारी विद्यमान नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यू जानेवारीच्या अखेरीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. कोविड संसर्गाचा वाढता प्रसार व राज्याची 10.30 टक्क्यांवर गेलेली सकारात्मकता विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. विद्यमान निर्बंध 19 जानेवारी रोजी संपणार होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या …
Read More »बेळगावात बूस्टर डोस लसीकरणाला प्रारंभ
बेळगाव : बेळगावातील पोलीस मुख्यालय जिल्हा पोलीस सभागृहात सोमवारी सकाळी बूस्टर डोस लसीकरण कार्याला प्रारंभ करण्यात आला आहे. बूस्टर डोस लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनाला जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ, आमदार अनिल बेनके, जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा लक्ष्मण निंबरगी, आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ.एस.व्ही. मुन्याळ, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.आय. पी. गडाद यांच्यासह अन्य अधिकारी …
Read More »जिल्ह्यातील शाळा 11 ते 18 जानेवारीपर्यंत बंद
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचा आदेश बेळगाव : बेळगाव शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची धास्ती घेत खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या सर्व शाळांना सुट्टी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बजावला आहे. उद्या मंगळवार 11 जानेवारीपासून 18 जानेवारी पर्यंत बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या …
Read More »हलगा-मच्छे बायपासच्या विकासात भ्रष्टाचाराचा संशय?
बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरासाठी सामान्य माणसाला कोणताही फायदा नसलेला आणि शेतकर्यांना उध्वस्त करणारा हलगा -मच्छे बायपास हा बेकायदेशीर आहे, याबद्दल न्यायालयात कायदेशीर लढा सुरु आहे. मात्र आता या बायपास प्रकरणात बेकायदेशीर कामासोबत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एकीकडे बहुतेक शेतकर्यांना मोबदला दिल्याचा कांगावा करायचा आणि दुसरीकडे …
Read More »भारतीय गुरुकुल ज्युनिअर कॉलेजतर्फे अॅड. सुधीर चव्हाण व अॅड. सचिन शिवनावर यांचा सत्कार
बेळगाव (वार्ता) : भारतीय गुरुकुल ज्युनिअर कॉलेज (बेळगुंदी क्रॉस) मध्ये नुकताच भारतीय गुरुकुल शिक्षण संस्थेच्यावतीने सुप्रसिद्ध वकील अॅड. सुधीर चव्हाण व अॅड. सचिन शिवनावर यांची बार असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने हृद्य असा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग नाईक उपस्थित होते. कॉलेजचे प्राचार्य आनंद आपटेकर यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta