Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

“गुरूवंदना” कार्यक्रमाला व्यापारी- उद्योजकांकडून सहकार्य

बेळगाव : सकल मराठा समाज बेळगावतर्फे आयोजित गुरुवंदना कार्यक्रम समाजाला संघटित करण्यासाठी अत्यंत स्तुत्य असला तरी असे कार्यक्रम सातत्याने झाले पाहिजेत तरच शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातील मराठा समाजाची एकजूट होऊ शकते हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे विचार उद्योजक विजय पाटील यांनी व्यक्त केले. बेळगावच्या सकल मराठा समाजातर्फे येत्या रविवार …

Read More »

गवळीवाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

रेड क्रॉस मार्फत वैद्यकीय तपासणी खानापूर : बेळगावपासून 70 किलोमीटर लांब असलेल्या रामनगरजवळ गवळीवाडा तालुका खानापूर येथील इयत्ता पहिली ते सहावीच्या सर्व 90 विद्यार्थ्यांना जवळपास 35 हजार रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक साहित्यामध्ये एक बॅग, एक पाऊच, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, दोन नोट बुक असे साहित्य …

Read More »

खा. मंगल अंगडी यांच्याहस्ते ग्राम वन सेवा केंद्राचे उद्घाटन

बेळगाव : बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शिंदोळी क्रॉस सांबरा रोड येथे सीएससी सेंटरचे उद्घाटन बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला अंगडी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील जनतेला सहाय्य व्हावे म्हणून या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे, याप्रसंगी बोलताना खासदार मंगला अंगडी …

Read More »

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर “गुरुवंदना”ची जिल्हाधिकार्‍यांनी घेतली माहिती

बेळगाव : आचारसंहिता लागू झाली असली तरी गुरुवंदनाचे प्रचार मोहीम राबवण्यात कोणती अडचण नाही. आचारसंहितेचे पालन करून “गुरुवंदना” कार्यक्रम करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची पूर्ण माहिती किरण जाधव यांच्याकडून घेतली. त्याचबरोबर कार्यक्रमासंबंधी जागृती करणारे फलक आहेत त्यावर राजकीय नेत्याच्या छबी असणारे फलक …

Read More »

सीमाभागातील मराठी संस्थांना अर्थसहाय्य मिळावे

बेळगाव : एल्गार सामाजिक साहित्य परिषद बेळगाव, अखिल भारतीय प्रगतीशील सामाजिक-सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगाव तसेच बेळगाव सीमाभागातील मराठी भाषा संवर्धनासाठी कार्यरत विविध संस्थांना आर्थिक सहाय्य करावे, अशा मागणीचे निवेदन माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांना देण्यात आले. सीमाभागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साहित्य, कला, क्रीडा, नाट्य, संस्कृतिक, वृत्तपत्र, वाचनालय, शाळा …

Read More »

गुरुवंदना कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद!

बेळगाव : सकल मराठा समाज बेळगावतर्फे रविवार दि. 15 मे रोजी मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांतचार्य परमपूज्य श्री. मंजुनाथ भारती स्वामीजी यांचा गुरुवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासंदर्भात जनजागृती केली जात असून ग्रामीण पूर्वभागामध्ये बसरीकट्टी, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री, सुळेभावी आदी भागात मराठा भाषिक एकत्र करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे …

Read More »

भाजपच्या कोअर कमिटीची उद्या बैठक

बंगळुरू : भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बंगळुरू येथे उद्या होणार असून या बैठकीत राज्यातील विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांबाबत चर्चा करून काही निर्णय घेण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, भाजप राज्याध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्याशी काल …

Read More »

ऐनापूर-नवलीहाळ रस्त्यासाठी दोन कोटी

आमदारांच्या प्रयत्नातून निधी मंजूर : श्रीनिवास पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांकडून प्रारंभ अथणी : ऐनापूर-नवलीहाळ रस्त्यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याच्या कामाची सुरुवात नुकतीच झाली. भाजपचे युवा नेते श्रीनिवास पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या हस्ते या कामाला प्रारंभ झाला. सदर रस्ता व्हावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. परंतु, निधीअभावी या …

Read More »

प्रकाश भोसले यांचे मरणोत्तर नेत्रदान

बेळगाव : सदाशिवनगर येथील रहिवासी प्रकाश शिवाजीराव भोसले यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. निधनसमयी ते ७३ वर्षाचे होते. निधनानंतर जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भोसले कुटुंबियांनी नेत्रदान करण्यास समर्थता दर्शविली. लागलीच के एल ई नेत्रपेढीच्या डॉ. अनु प्लासीड आणि डॉ. समवेद्य यांनी आपल्या …

Read More »

“गुरुवंदना” कार्यक्रमास्थळी पोलीस प्रशासनाची भेट

बेळगाव : बेळगाव सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दिनांक 15 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना कार्यक्रमासंदर्भात पोलीस प्रशासनाने आज संपूर्ण कार्यक्रमाचे माहिती जाणून घेतली छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेच्या मिरवणुकी मार्गाची पाहणी केली तसेच आदर्श विद्या मंदिर पटांगणावर उपस्थित राहून आढावा घेतला. कार्यक्रमास उपस्थितांची संख्या किती असेल, पार्किंगची व्यवस्था …

Read More »