Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांचे वादग्रस्त वक्तव्य

बेंगळूर : भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांच्या धर्मांतराच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, नंतर त्यांनी आपले विधान बिनशर्त मागे घेतले आहे. कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे खासदार तेजस्वी सूर्य यांनी उडुपी येथील एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य मागे घेतले आहे. ज्यामध्ये सूर्या यांनी ज्यांनी हिंदू धर्म सोडला त्या सर्वांची घरवापसी झाली …

Read More »

अटलबिहारी वाजपेयी यांचे कार्य अविस्मरणीय : किरण जाधव

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी विमल फौंडेशनचा अभिवादन कार्यक्रम बेळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आज साजरा करण्यात आला. विमल फौंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या संपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी देशहितासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. जय जवान, जय किसान बरोबरच जय …

Read More »

महाराष्ट्र खासदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार : खास. शरद पवार

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळाने आज सिल्व्हर ओक येथे माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि खासदार शरद पवार यांची भेट घेतली. सीमाभागात कर्नाटक शासनाकडून मराठी बांधवावर होत असलेल्या दडपशाहीची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबनेनंतर आक्रोश व्यक्त करण्यासाठी धर्मवीर संभाजी चौकात जमलेल्या मराठी तरुणांवर बेळगावच्या विविध पोलीस ठाण्यात …

Read More »

धर्मांतर कायद्याबाबत काँग्रेस-भाजपचे नाटक : एच. डी. कुमारस्वामी

बेळगाव (वार्ता) : केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. राज्यातील कन्नड भाषिकांची चिंता या सरकारला नाही तसेच आतापर्यंत केंद्र सरकारनेही राज्यातील जनतेची कोणती मदत केली नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केलाय. बेळगाव सुवर्णसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रित दिली आहे. कृष्णा नदी प्रकल्पाची राष्ट्रीय योजना करण्यासाठी तत्कालीन …

Read More »

विद्यापीठे हे ठोस संशोधनाचे व्यासपीठ असावे : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

बेळगाव (वार्ता) : विद्यापीठांनी शिक्षणास पोषक वातावरण निर्माण करावे. वर्तमान काळ ज्ञानाचे शतक आहे. जगाची शक्ती ज्ञानाकडे झुकते. विद्यापीठांनी हे लक्षात घेऊन शिक्षणाचा दर्जा सुधारावा. विद्यापीठे हे ठोस संशोधनाचे व्यासपीठ असावे, असे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केले आहे. हिरेबागडेवाडी येथे 126 एकर परिसरात उभारण्यात येत असलेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या …

Read More »

सुवर्णसौधमध्ये व्हिडिओ जर्नलिस्ट्सना प्रतिबंध; पत्रकारांचे आंदोलन

बेळगाव (वार्ता) : वादग्रस्त धर्मांतर बंदी विधेयकाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील चर्चेचे वृत्तांकन करण्यास प्रसारमाध्यमांवर सुवर्णसौधमध्ये बुधवारी निर्बंध लादण्यात आले. याच्या निषेधार्थ पत्रकारांनी निदर्शने केली. कोणत्याही प्रसारमाध्यमांच्या कॅमेर्‍यांना सुवर्णसौधमध्ये प्रवेश देऊ नये असा आदेश सरकारने काढल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसौध सचिवालयाकडून व्हिडिओ जर्नलिस्ट्सना बाहेर काढले. विधानसभा लॉन्ज आणि विरोधी पक्ष कक्षाजवळ कॅमेरा आणण्यास सभापतींनी …

Read More »

उत्तर कर्नाटकातील पाणी योजना अंमलबजावणीसाठी सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री बोम्माई यांची माहिती

बेळगाव (वार्ता) : कृष्णा पाणी योजनेच्या तिसर्‍या टप्प्यात अनेक अडचणी आल्या आहेत. या संदर्भात न्यायालयीन वादही सुरू आहे. पुढील महिन्यात दहा तारखेला सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सोबतचा वाद आटोक्यात आला आहे. तेलंगणा सरकारने आपली याचिका मागे घेतली आहे. म्हादाईमधून कर्नाटकच्या वाट्याला कमी पाणी मिळाले आहे, याची माहिती केंद्रीय समितीला देण्यात …

Read More »

पोलिसांनी खोटे गुन्हे मागे घ्यावे : श्रीरामसेना हिंदुस्तानची मागणी

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्यावतीने सीमा भागातील युवकांवर तसेच स्वयंसेवकांवर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमांतर्गत निरपराध विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याने भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटक सरकारचे गृहमंत्री अरग ज्ञानेन्द्र यांना निवेदन देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे बेंगलोरमध्ये विटंबना झाल्यानंतर त्याचे पडसाद बेळगावमध्ये उमटले. यावेळी …

Read More »

बेळगाव शहरातील 16.50 कोटी रुपये खर्चाच्या क्रीडा संकुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरात उभारण्यात आलेल्या 16.50 कोटी रुपये खर्चाच्या क्रीडा संकुलाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि रेशीम, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा मंत्री डॉ. नारायण गौडा यांच्या हस्ते आज मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. 16.50 कोटी रुपये खर्च करून, इनडोअर स्टेडियम आणि महिला क्रीडा वसतिगृह बांधण्यात आले आहे. बेळगाव येथील क्रीडा …

Read More »

हिरेबागेवाडी येथे भीषण अपघातात 3 ठार

बेळगाव (वार्ता) : हिरेबागेवाडीजवळील विरप्पनकोप क्रॉसजवळ झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. अपघातातील तीघेही मृत यल्लापूर (जि. कारवार) येथील रहिवासी होते. याबाबतची माहिती अशी की, धारवाड येथून बेळगावच्या दिशेने भरधाव वेगात येणारी कार विरप्पनकोप क्रॉस जवळ आली असता रस्त्यात थांबलेल्या एका ट्रकवर जोराने आदळली. …

Read More »