बेळगाव : बेळगाव जिल्हा जिम ओनर्स असोसिएशन यांच्यावतीने आज रविवार दि. 8 रोजी सर्वसाधारण बैठक शिवबसव प्लाझा फुलबाग गल्ली येथे घेण्यात आली. संस्थापक किरण कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत मागील वर्षांतील जमाखर्च सादर करण्यात आला. त्याचप्रमाणे एकमताने नवीन कमिटीची निवड करण्यात आली. नवीन कमिटी पुढीलप्रमाणे अध्यक्षपदी चेतन ताशीलदार तर …
Read More »LOCAL NEWS
बंगळुरुतील चेंगराचेंगरीत गमावलेल्या मुलाच्या कबरीवर वडिलांचा आक्रोश
बंगळुरू : बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवर झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी लोक जमले होते. एका वडिलांचा आपल्या मुलाच्या कबरीला मिठी मारताना रडण्याचा व्हिडिओ सर्वांच्या जखमा उघड करतो. व्हिडिओमध्ये, चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या २१ वर्षीय …
Read More »यशाचा राजमार्ग मेहनतीतून जातो : सचिन शिंदे यांचे प्रतिपादन
मराठी अध्यापक संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा चंदगड : “आयुष्यात यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग न पत्करता प्रामाणिकपणे कष्ट घेणं गरजेचं आहे. कारण प्रामाणिक प्रयत्नांनी मिळालेलं यशच खऱ्या अर्थाने टिकतं आणि जीवनाला दिशा देतं,” असे स्पष्ट मत कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. सचिन शिंदे यांनी व्यक्त केले. …
Read More »चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरण : क्रिकेट असोसिएशनच्या सचिव आणि कोषाध्यक्षांचा राजीनामा
बंगळुरू : बंगळुरू संघाने १८ वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकल्याच्या पार्श्वभूमीवर विजयोत्सव मिरवणुकीदरम्यान बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणात कर्नाटक सरकारने कारावाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत रायल चॅलेंज बंगळूरु (आरसीबी) आणि कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) …
Read More »दिवंगत शीतल बडमंजी यांची श्रद्धांजलीपर शोकसभा 9 रोजी
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनच्या जेष्ठ शिक्षिका, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, शीतलताई बडमंजी यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले… त्यांच्या निधनाच्या शोक प्रित्यार्थ सोमवार दिनांक ९ जून रोजी सायं. ४.३० वा. मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, मराठी विद्यानिकेतन, मराठा …
Read More »ए. एम. शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांची केंद्रीय संशोधन प्रयोगशाळेला भेट
बेळगाव : एम. एम. शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि पीजी रिसर्च सेंटर, बेळगाव येथील संशोधन अभ्यासकांच्या विद्यार्थ्यांनी अलिकडेच मराठा मंडळच्या केंद्रीय संशोधन प्रयोगशाळेतील अत्याधुनिक संशोधन प्रयोगशाळेला भेट दिली. या भेटीचा उद्देश प्रयोगशाळेतील सुविधांचा शोध घेणे, चालू संशोधन प्रकल्पांबद्दल जाणून घेणे आणि सहकार्याच्या संधी वाढवणे हा होता. भेटीदरम्यान, संशोधन …
Read More »सौंदत्ती यल्लमा डोंगरावरील पायाभूत सुविधांची विकास कामे त्वरित सुरू करा : मंत्री एच. के. पाटील यांची सुचना
बेळगाव : दरवर्षी लाखो भाविकांची आराध्य देवता असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थान येथील पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे त्वरित सुरू करण्याच्या सूचना,कायदा, संसदीय कामकाज, कायदे आणि पर्यटन मंत्री एच.के. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बेळगावला आलेल्या मंत्री एच के पाटील यांनी,आज शुक्रवारी यल्लमा डोंगरावरील व्यापक विकास आराखड्यासंदर्भात बैठक बोलावली होती. …
Read More »बकरी ईदनिमित्त कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या गायींची सुटका!
बेळगाव : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलखान्यात नेण्यासाठी जमा केलेल्या गायींची गोरक्षकांनी सुटका केल्याची घटना बेळगावात घडली आहे. बकरी ईदमुळे गायींना कत्तलखान्यात नेण्यासाठी एकत्र केले जात असल्याची माहिती मिळताच, गोरक्षक मारुती सुतार यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या इतर कार्यकर्त्यांसह गायींची सुटका करून त्यांना गोशाळेत नेले. देशात गोतस्करी आणि …
Read More »अटक केलेल्या आरसीबी, डीएनए कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची कोठडी
बंगळूर : चिन्नास्वामी चेंगराचेंगरी दुर्घटनेप्रकरणी उच्च न्यायालयाने आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए कर्मचाऱ्यांसह पाच आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले आहेत. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत अटक केलेल्या पाच आरोपींना आज ४१ व्या एएसीएमएम न्यायालयात हजर करण्यात आले. कब्बन पार्क पोलिसांनी डीएन संचालक सुनील मॅथ्यू, …
Read More »चेंगराचेंगरी प्रकरणी चार जणांना अटक; पोलिस ठाण्यात चौघांचीही चौकशी सुरू
बंगळूर : आरसीबीच्या आयपीएल विजयोत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी सीसीबी पोलिस आणि कब्बन पार्क पोलिसांनी संयुक्त कारवाईत आरसीबी मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे आणि चार कार्यक्रम आयोजकांना अटक केली आहे. आरसीबी मार्केटिंग चीफ निखिल सोसाळे यांच्यासह डीएनए मॅनेजमेंट स्टाफ सुनील मॅथ्यू, किरण आणि सुमंत यांना अटक करण्यात आली आहे. विशिष्ट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta