बेळगाव : रायबाग येथील राम मंदिर मठाचे लोकेश्वर स्वामीजी यांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे, तर त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मेकळी गावातील मठाच्या स्वामीजींनी त्यांच्या मठात येणाऱ्या एका भक्ताच्या मुलीला अन्य जिल्ह्यात घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आल्यानंतर मुडलगी …
Read More »LOCAL NEWS
बेळगावात कोरोना रुग्ण: गर्भवती महिलेची चाचणी पॉझिटिव्ह
बेळगाव : कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. बेंगळुरूमध्ये ९ महिन्यांच्या बाळाला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर, कोविड आता बेळगावात पोहोचला आहे. बेळगावमधील एका गर्भवती महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका २७ वर्षीय …
Read More »बेळगाव शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता हरपला; शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश राऊत यांचे हृदयविकाराने निधन
बेळगाव : बेळगाव शिवसेना उपशहर प्रमुख, समर्थ नगर येथील पंच प्रकाश बंडू राऊत (वय 52) रा. मूळ गाव बडस, सध्या राहणार समर्थनगर बेळगाव यांचे आज शुक्रवार दि. 23 रोजी रात्री 10 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे पत्नी असा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवारी सकाळी 11 वाजता …
Read More »अलमट्टीच्या उंचीची अधिसूचना जारी करण्यासाठी केंद्रावर दबाव
उपमुख्यमंत्री शिवकुमार; भूसंपादन प्रक्रिया सुरू बंगळूर : “आम्ही अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याची अधिसूचना जारी करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणत आहोत. यासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे,” असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले. विजापूर जिल्ह्यातील कोल्हारा येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी …
Read More »नॅशनल हेराल्डला देणगी दिल्याचा ‘डीके ब्रदर्स’वर आरोप; ईडीच्या आरोपपत्रात उल्लेख
बंगळूर : नॅशनल हेराल्ड प्रकरण आता डीके ब्रदर्सपर्यंत येऊन पोहोचले आहे. यंग इंडियासाठी डी. के. शिवकुमार आणि त्यांचे बंधू डी. के. सुरेश यांनी २.५ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले. नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात ईडीने न्यायालयात अतिरिक्त आरोपपत्र दाखल केले आहे. अतिरिक्त चार्जशीटमध्ये डीके ब्रदर्स हे …
Read More »अल्पवयीन सामूहिक अत्याचार प्रकरणी रिसॉर्ट संचालकांसह तिघे ताब्यात
बेळगाव : टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकरणी आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची एकूण संख्या पाच झाली आहे. अलीकडेच अटक करण्यात आलेल्यांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सीपीआयचा अल्पवयीन मुलगा आणि ज्या रिसॉर्टमध्ये गुन्हा घडला होता तो चालवणारे रोहन पाटील …
Read More »विजेच्या धक्क्याने शिक्षकाचा मृत्यू; अथणी येथील घटना
बेळगाव : आपल्या लग्नाचा साजरा करून घरी परतलेल्या शिक्षकाला घरासमोरील गेट उघडणे जीवावर बेतले. गेटला विजेच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अथणी शहराच्या सत्य प्रमोद नगर येथे घडली आहे. प्रवीणकुमार कडापट्टिमठ (वय ४१) असे या दुर्दैवी शिक्षकाचे नाव आहे. प्रवीणकुमार कडापट्टिमठ हे मूळचे तेरदाळ गावचे रहिवासी होते. …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक शनिवारी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक शनिवार दिनांक 24 मे 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार श्री. मनोहर किनेकर यांनी केले आहे.
Read More »बेळगावमध्ये ऑटो मीटर सक्तीचे करण्यात येणार; जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगाव : बेळगावमध्ये पुढील तीन महिन्यांत ऑटो मीटर सक्तीचे केले जाईल, अशी घोषणा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली आहे. आज पत्रकार संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, ऑटो मीटर सक्तीचे करण्यासाठी त्यांनी आणि प्रादेशिक परिवहन आयुक्तांनी अनेकदा बैठका घेतल्या असून, ऑटो चालक …
Read More »मुतगा कृषी पत्तीन सहकारी संघाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी; भागधारकांची मागणी
बेळगाव : मुतगा (ता. जि बेळगाव) येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ लिमिटेड या संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि या संस्थेकडून गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेले पीक कर्जाचे वाटप तात्काळ पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी संस्थेच्या भागधारक शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मुतगा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta