Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता हरपला; शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश राऊत यांचे हृदयविकाराने निधन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शिवसेना उपशहर प्रमुख, समर्थ नगर येथील पंच प्रकाश बंडू राऊत (वय 52) रा. मूळ गाव बडस, सध्या राहणार समर्थनगर बेळगाव यांचे आज शुक्रवार दि. 23 रोजी रात्री 10 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे पत्नी असा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवारी सकाळी 11 वाजता सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत अंत्य संस्कार केले जाणार आहेत.

मूळचे बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील बडस या गावचे प्रकाश राऊत. व्यवसायानिमित्त बेळगावमध्ये समर्थ नगरला स्थायिक होते. बापट गल्लीत त्यांचे डिश टीव्ही विक्रीचे छोटेसे दुकान होते. सुरुवातीच्या काळात कामा निमित्त जवळपास 15 ते 20 वर्ष त्यांनी मुंबईत काढली होती त्यावेळी ते शिवसेनेच्या संपर्कात आले. मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या वार्डात ते राहत होते. त्यामुळे त्यांच्याशी त्यांची जवळीक होती. बेळगाव सीमा प्रश्नाचा किंवा बेळगावच्या मराठी माणसाच्या प्रश्नाला चालना देण्यासाठी मुंबईचे आमदार सुनील शिंदे माजी आमदार दगडू सपकाळ आणि शिवसेनेच्या आमदारांशी ते थेट संपर्क करत होते. बेळगावात जेवढे शिवसैनिक आहेत त्यापैकी एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. अशा या बेळगावच्या कट्टर शिवसैनिकाची एक्झिट झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *