Sunday , July 26 2026
Breaking News

विजेच्या धक्क्याने शिक्षकाचा मृत्यू; अथणी येथील घटना

Spread the love

 

बेळगाव : आपल्या लग्नाचा साजरा करून घरी परतलेल्या शिक्षकाला घरासमोरील गेट उघडणे जीवावर बेतले. गेटला विजेच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अथणी शहराच्या सत्य प्रमोद नगर येथे घडली आहे. प्रवीणकुमार कडापट्टिमठ (वय ४१) असे या दुर्दैवी शिक्षकाचे नाव आहे.
प्रवीणकुमार कडापट्टिमठ हे मूळचे तेरदाळ गावचे रहिवासी होते. अथणी तालुक्यातील सत्ती येथील सरकारी माध्यमिक शाळेत ते कन्नड विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. कालच त्यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. पत्नी व मुलांसोबत प्रवास करून ते घरी परतले होते. रात्रीच्या सुमारास, आपले घर गाठल्यानंतर ते घरासमोरील लोखंडी गेट उघडत होते. नेमके त्याचवेळी गेटमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा त्यांना जोरदार धक्का बसला. विजेच्या धक्क्याने ते जागेवरच कोसळले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

या घटनेमुळे कडापट्टिमठ कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. अथणी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *