Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

बेळगाव महानगरपालिकेच्या सदस्यांच्या शिष्टमंडळाने घेतला इंदूर शहर स्वच्छतेचा धडा

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या सदस्यांचे शिष्टमंडळ इंदूरला गेले आहे. या शिष्टमंडळाने तेथील कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या पद्धतींचा सखोल माहिती घेतली. बेळगाव महानगरपालिकेच्या सदस्यांच्या शिष्टमंडळाने भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदूरचा अभ्यास दौरा केला. महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी पक्षाचे नेते हणमंत कोंगाळी आणि सर्व नगरसेवकांनी भारतातील सर्वात स्वच्छ …

Read More »

बेळगाव क्लोथ मर्चंट असोसिएशनचा पदग्रहण समारंभ संपन्न

  बेळगावच्या कापड व्यवसायाला सुसज्ज करण्यासाठी प्रयत्नशील: सतिश तेंडोलकर बेळगाव : बेळगाव क्लोथ मर्चंट असोसिएशनचा पदग्रहण समारंभ काल मंगळवारी पार पडला. अध्यक्षपदी सतीश तेंडोलकर, उपाध्यक्षपदी मुकेश सांगवी व राजू पालीवाला, सेक्रेटरी मुकेश खोडा, सह सेक्रेटरी कमलेश खोडा, खजिनदार पदी लालचंद छापरू व सह खजिनदार पदी नितेश जैन यांची निवड करण्यात …

Read More »

ट्रक खाली सापडून भिक्षुकाचा मृत्यू; कोल्हापूर सर्कलजवळील घटना

बेळगाव : बेळगाव शहरातील कोल्हापूर सर्कल जवळील सिग्नलवर आज सकाळी ११ वा. सुमारास भिक्षुकाचा ट्रक खाली सापडून मृत्यू झाला. या अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उत्तर वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित वाहन चालकाला अटक केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. …

Read More »

निळ्या ‘पीक कॅप’मध्ये झळकणार कॉन्स्टेबल; आजपासून राज्य पोलिसांचा नवा लूक

  पारंपारिक स्लॉच हॅटला निरोप बंगळूर : कर्नाटक पोलिस दलाचा गणवेश आजपासून अधिक आधुनिक आणि आकर्षक दिसणार आहे. पारंपारिक ‘स्लॉच हॅट’ला निरोप देत, राज्यातील पोलिस कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल आता निळ्या रंगाच्या ‘पीक कॅप’मध्ये झळकणार आहेत. हा ऐतिहासिक बदल मंगळवारी विधानसौधाच्या बँक्वेट हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात झाला. या समारंभात मुख्यमंत्री …

Read More »

काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे; युवा समितीच्या बैठकीत आवाहन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांची व्यापक बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल येथे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले. भाषावार प्रांतरचनेत मराठी बहुल प्रदेश तत्कालीन केंद्र सरकारने …

Read More »

41 व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावचे स्केटर्स चमकले

  बेळगाव : बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो.चे निवड झालेले स्केटर्स 41 व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये 200 च्यावर कर्नाटक राज्यातील टॉप स्केटिंगपटू सहभाग घेतला होता. या स्पर्धा तुमकुर व बेंगलोर येथे पार पडल्या.या स्पर्धेत बेळगांवच्या स्केटर्सनी चमकदार कामगिरी करत 13 सुवर्ण,8 रौप्य व 3 कांस्य …

Read More »

बेळगाव जिल्हा बँकेवर महिला आरक्षण का लागू नाही?

  बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाची पंचवार्षिक निवडणूक नुकताच पार पडली. 16 संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत एकही महिला संचालक नसल्याने राज्यभरात राजकीय वर्तुळात ही निवडणूक मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. राज्य सरकारकडून सहकारी संस्थांवर महिला आरक्षणाचे विधेयक संमत झाले असताना बँकेवर एकही महिला संचालक नसल्याने जिल्हा …

Read More »

पोलीस प्रशासनाच्या नोटिसीला समिती कायदेशीररित्या उत्तर देणार

  बेळगाव : 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती नेते मनोहर किणेकर, मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे यांना खबरदारीसंदर्भात नोटीस बजावली होती. या नोटिसीला महाराष्ट्र एकीकरण समिती कायदेशीररित्या उत्तर देणार असून कितीही दडपशाही झाली तरी 1 नोव्हेंबर रोजी काळ्या दिनी सायकल फेरी निघणारच असा वज्र निर्धार …

Read More »

प्रेयसीसोबत लॉजवर वेळ घालवत असलेल्या पतीला पत्नीने भररस्त्यात चोपले

  बेळगाव : चिकोडी शहरातील बस स्थानकाजवळील एका लॉजमध्ये प्रेयसीसोबत वेळ घालवत असलेल्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले आणि भररस्त्यात चप्पलने चोपवल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश भोसले नावाचा विवाहित पुरुष आपल्या प्रेयसीसोबत लॉजमध्ये आला होता. याची माहिती पत्नीला मिळताच तिने थेट लॉज गाठले आणि त्याला पकडले. संतापलेल्या पत्नीने पतीच्या कॉलरला …

Read More »

डी वाय चौगुले भरतेश हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे ज्युडो स्पर्धेत यश

बेळगाव : येथील भरतेश एज्युकेशन ट्रस्ट संचलित डी वाय चौगुले भरतेश हायस्कूल येथील विद्यार्थिनी कुमारी अंजली पाटील हिने 70+ वजन गटात प्रथम क्रमांक घेऊन ज्यूडो स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. तसेच दुसरी विद्यार्थीनी कुमारी नेत्रा पत्रावळी हिने दुसरा क्रमांक -40 या वजन गटात घेऊन रौप्य पथक पटकाविलेले आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा …

Read More »