Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

काँग्रेसचे पैसे वाटणाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले!

  गोकाक : गोकाकमध्ये काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर आणि टीमकडून मतदारांना वाटण्यासाठी आणलेली रक्कम भाजपा कार्यकर्त्यांनी जप्त करून पोलिसांच्या हवाली केल्याची घटना आज घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गोकाक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी पैसे वाटप करण्यास आलेल्या पाच जणांना भाजप समर्थकांनी रंगेहात पकडून …

Read More »

मतदान जनजागृतीसाठी बेळगावात बुलेट बाईक जथा

  बेळगाव : जिल्हा सफाई समितीच्या वतीने चन्नम्मा सर्कल येथे आज शनिवारी (4 मे) आयोजित अनिवार्य मतदान जनजागृती बाईक जथा कार्यक्रमास जिल्हा स्वीप समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी मंजुरी दिली. यावेळी बोलताना जेपीएमचे सीईओ राहुल शिंदे म्हणाले की, जिल्हाभर स्वीप …

Read More »

जगदीश शेट्टर यांच्या विजयासाठी स्थानिक नेते लागले जोमाने कामाला

  किरण जाधव यांनी घेतली बैठक : शेट्टरांना निवडून देण्याचे केले आवाहन बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी बेळगाव शहर परिसरातील नेते आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. ‘आपकी बार 400 पार’ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी चंग बांधला आहे. त्या अनुषंगाने बेळगावमधील स्थानिक …

Read More »

“मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, पीडित महिलेने वाचला प्रज्ज्वल रेवण्णांच्या अत्याचाराचा पाढा

  बेंगळुरू : कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा नेता आणि भारतातून पळ काढलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाच्या कुकर्माची एक एक कहाणी आता समोर येऊ लागली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या एका महिलेने धाडस दाखवत प्रज्ज्वलच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे. प्रज्ज्वलने सदर महिलेवर बलात्कार करत तिचे चित्रीकरण केले आणि या चित्रीकरणाचा वापर …

Read More »

९ मे रोजी शिवजयंती; परंपरेनुसार शनिवारी चित्ररथ मिरवणूक

  बेळगाव : बेळगावमध्ये अक्षय तृतीयेच्या आदले दिवशी म्हणजेच वैशाख द्वितीयेला पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षीही गुरुवार दि. ९ मे रोजी शिवजयंती साजरी होणार असून शनिवार दि. ११ मे रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. …

Read More »

माजी महापौरांचा महाप्रचार आणि समितीचा घातला आचार…

  महाराष्ट्र एकीकरण समितीचा बट्याबोळ करायचा विडाच जणू काही लोकांनी उचललेला दिसतो. मराठी माणसाचा घात मराठी माणूसच करू शकतो हेच खरे. एवढी वर्ष गटतट म्हणून समितीचा उद्धार करणाऱ्या लोकांनी आता उघड उघड राष्ट्रीय पक्षांचे जोडे उचलण्याची सपारीच घेतली आहे. एरवी समितीसाठी किती काम करतो, आपण मराठी कसे, समितीनिष्ठ कसे हे …

Read More »

सेक्स स्कँडल प्रकरण बाहेर आल्यानंतर घरकाम करणारी महिला बेपत्ता

  बेंगळुरू : जेडीएसचे नेते प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडलमुळे कर्नाटकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरण उजेडात आल्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णा यांनी देशाबाहेर पळ काढला असला तरी त्यांचे वडील आणि जेडीएसचे आमदार एचडी रेवण्णा यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता नव्या घडामोडींनुसार कर्नाटकचे माजी मंत्री …

Read More »

चलवेनहट्टीत ब्रम्हलिंग मंदिरचा पहिला वर्धापन दिन

  बेळगाव : चलवेनहट्टी येथे श्री ब्रम्हलिंग मंदिरचा पहिला वर्धापन दि. ४ व ५ मे असा दोन दिवस साजरा होणार आहे. दि. ४ रोजी वेगवेगळ्या गावचे हारीपाठ होणार आहेत तसेच आठ वाजता तुरमुरी येथील‌ प्रसिद्ध किर्तनकार बाळू भक्तिकर यांचे रात्री ८-०० किर्तन होणार आहे तसेच किर्तन सोहळा संपल्यावर नंतर गावातील …

Read More »

डॉ. सरनोबत दाम्पत्याकडून जगदीश शेट्टर यांचा सत्कार

  बेळगाव : शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत परिवारातर्फे बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांना संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्याबरोबरच त्यांचा चांदीची तलवार देऊन सत्कार करण्यात आला. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज शुक्रवारी सकाळी आपल्या प्रचार दौऱ्याप्रसंगी नियती …

Read More »

अश्लील चित्रफीत प्रकरण; प्रज्वलविरुध्द लुकआउट नोटीस जारी

  वेळ देण्याची विनंती एसआयटीने फेटाळली बंगळूर : हसन सेक्स स्कँडलची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) विद्यमान जेडी(एस) खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे. मंगळवारी हजर राहण्याच्या नोटीसनंतर पिता-पुत्र दोघेही एसआयटीसमोर हजर न राहिल्याने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, प्रज्वलच्या वकीलांनी केलेली सात दिवसाची वेळ देण्याची …

Read More »