Monday , September 21 2026
Breaking News

जगदीश शेट्टर यांच्या विजयासाठी स्थानिक नेते लागले जोमाने कामाला

Spread the love

 

किरण जाधव यांनी घेतली बैठक : शेट्टरांना निवडून देण्याचे केले आवाहन

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी बेळगाव शहर परिसरातील नेते आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. ‘आपकी बार 400 पार’ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी चंग बांधला आहे. त्या अनुषंगाने बेळगावमधील स्थानिक नेतेही गल्लोगल्ली आणि घरोघरी जाऊन उमेदवार जगदीश शेट्टर यांचा प्रचार करीत आहे.
भाजप युवा नेते किरण जाधव यांनी आज भोई गल्ली, भडकल गल्ली आणि खडक गल्ली परिसरातील प्रमुख महिला भगिनींची बैठक घेऊन जगदीश शेट्टर यांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचे आवाहनन केले. यावेळी किरण जाधव यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम भारताच्या निर्मितीसाठी चाललेले प्रयत्न आणि त्यांनी केलेल्या विकास कामांची आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती महिला भगिनींना दिली.
यावेळी परिसरातील प्रमुख महिला भगिनींनी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी बेळगाव लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच परिसरात फिरून जगदीश शेट्टर यांना अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
यावेळी एंजल फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. मीना बेनके, सौ. सरोज आळवणी, राहुल जाधव, राजन जाधव यासह गल्लीतील प्रमुख महिला उपस्थिती होत्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *