Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ

  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, आणि वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समादेवी गल्ली बेळगाव येथील श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला आज मंगळवार दि. 20 फेब्रुवारी पासून मोठ्या भक्तीमय वातावरणात व मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी प्रमुख पाहुण्यांनी सरस्वती वाचनालय शहापूर बेळगावचे अध्यक्षा सौ. स्वरूपा …

Read More »

सीमाप्रश्नी उद्या महत्वपूर्ण बैठक!

  बेळगाव : शिनोळी येथील सीमेवर महाराष्ट्र शासनाने नोडल अधिकारी नियुक्त केल्यानंतर बेळगावसह सीमाभागात सीमाप्रश्नी हालचालीना वेग आला आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी 21 रोजी दुपारी 12:15 वाजता विशेष बैठक बोलावली आहे. मागील दोन आठवड्यात मंत्री देसाई यांनी बैठक घेतली होती. अनेक विषयावर …

Read More »

कुमारस्वामींकडून कॉंग्रेस आमदारांना धमकी

  डी. के. शिवकुमार; राज्यसभा निवडणुकीसाठी अमिष बंगळूर : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी आमच्या आमदारांना ऑफर आणि धमक्या देत असल्याची माहिती मला मिळाली आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला. सोमवारी विधानसौध येथे प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, “कुमारस्वामी कोणाला फोन करत आहेत, ते …

Read More »

सिद्धरामय्या यांच्यावरील खटल्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

  बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्यातील 2022 च्या निषेध मोर्चाच्या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांविरुद्धच्या कारवाईला स्थगिती दिली. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि पी. के. मिश्रा यांच्या खंडपीठाने कर्नाटक सरकार आणि तक्रारकर्त्यांना नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, राज्यमंत्री एम. बी. पाटील आणि …

Read More »

सीमाभागातील मराठी जनतेसाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रभावी योजना : राज्यपाल रमेश बैस

  मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज मंगळवारी सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता विधानमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोर राज्यपाल रमेश बैस यांनी केलेल्या अभिभाषणात त्यांनी, महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नाचा विशेष उल्लेख केला. अभीभाषणात बोलताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात …

Read More »

श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव उद्यापासून

  बेळगाव : दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला उद्या मंगळवार दि. 20 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. उद्या सकाळी 6 ते 7 या वेळेत सनईचौघडा व काकड आरतीने उत्सवाला सुरुवात होणार असून दुपारी 12 वाजेपर्यंत कुंकुमार्चन होणार आहे. सकाळी अकरा वाजता श्री समादेवी मंगल कार्यालयात श्रीदेवी दरबाराचे उद्घाटन होणार असून यावेळी …

Read More »

संजीवीनी फौंडेशनमध्ये हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न

  बेळगाव : आदर्शनगर येथील संजीवीनी फौंडेशन येथे हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला. तालुका आरोग्य कार्यालयातील आशा कार्यकर्त्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या. आशा कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना डॉ. सरनोबत यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून अशीच समाजाची सेवा करत रहा असे सांगितले. …

Read More »

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीची येळ्ळूर गावामध्ये जल्लोषात मिरवणूक

  येळ्ळूर : महाराष्ट्र चौक येळ्ळूर या ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीची मिरवणूक येळ्ळूर गावांमध्ये सोमवार तारीख 19 रोजी अगदी जल्लोषी वातावरणात, शेकडो शिवभक्त, आबालवृद्ध, महिला व मुले यांच्या उपस्थितीत भगवे मय वातावरणात काढण्यात आली. मिरवणकीला सकाळी 12:00 वाजता सैनिक भवन येळ्ळूर येथून सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीमध्ये …

Read More »

रेल्वे स्थानकावर “ती” शिल्प उभारण्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेट!

  बेळगाव : येत्या 15 दिवसाच्या आत बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय जागी छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत श्री बसवेश्वर यांची शिल्प बसविण्यात यावीत. अन्यथा भीमसैनिक, शिवसैनिक आणि बसव सैनिक संयुक्तरीत्या स्वतः येऊन ही शिल्प लावतील. त्यावेळी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न झाला किंवा गोळ्या घातल्या तरी कोणत्याही परिस्थितीत शिल्प …

Read More »

महापालिकेच्या गोवावेस येथील विभागीय कार्यालयात चोरी

  बेळगाव : बेळगाव येथील बसवेश्वर सर्कलजवळील बेळगाव महापालिकेच्या दक्षिण विभागाच्या महसूल शाखेत चोरी झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. महापालिकेच्या गोवावेस येथील विभागीय कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडून चोरट्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला व लॅपटॉप चोरून पलायन केले. त्यांनी मालमत्ता मालकीचे कागदपत्र, मालमत्ता मालकाचे ओळखपत्र, कर प्रमाणपत्र, बांधकाम परवाना यासह …

Read More »