Monday , September 21 2026
Breaking News

सीमाभागातील मराठी जनतेसाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रभावी योजना : राज्यपाल रमेश बैस

Spread the love

 

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज मंगळवारी सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता विधानमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोर राज्यपाल रमेश बैस यांनी केलेल्या अभिभाषणात त्यांनी, महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नाचा विशेष उल्लेख केला. अभीभाषणात बोलताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नी महाराष्ट्र सरकार संपूर्ण ताकतीने उभी आहे. याचबरोबर सीमा भागातील मराठी जनतेच्या हितासाठी अनेक प्रभावी योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. सीमा भागातील मराठी जनतेला आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही राज्यपाल बैस यांनी यावेळी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *