Sunday , July 26 2026
Breaking News

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीची येळ्ळूर गावामध्ये जल्लोषात मिरवणूक

Spread the love

 

येळ्ळूर : महाराष्ट्र चौक येळ्ळूर या ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीची मिरवणूक येळ्ळूर गावांमध्ये सोमवार तारीख 19 रोजी अगदी जल्लोषी वातावरणात, शेकडो शिवभक्त, आबालवृद्ध, महिला व मुले यांच्या उपस्थितीत भगवे मय वातावरणात काढण्यात आली. मिरवणकीला सकाळी 12:00 वाजता सैनिक भवन येळ्ळूर येथून सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथक, धनगरी वाद्य व टाळ मृदंगांचा निनाद सुरू होता. शेकडो शिवभक्त मिरवणुकीमध्ये डोक्यावर भगवा फेटा बांधून सहभागी झाले होते. तत्पूर्वी सैनिक भवन या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांगळेश्वरी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण कंग्राळकर हे होते. तर पाहुणे म्हणून काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर, माजी एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, काँग्रेसचे नेते एस. एम. बेळवटकर, येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील हे होते. दीपप्रज्वलन परशराम सांबरेकर, प्रसाद कानशिडे, सचिन मजुकर, हणमंत पाटील, यशवंत संभाजीचे, मोहन कुगजी, यल्लाप्पा उडकेकर यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश पूजन चांगळेश्वरी शिक्षण संस्थेचे संस्थापक वाय. एन. मजुकर यांनी केले. कलश पूजन सुजाता उडकेकर यांनी केले, ध्वज पूजन तानाजी हलगेकर यांनी केले, वाद्यपूजन विजय मालूचे यांनी केले, आश्वरूढ मूर्तीचे पूजन माजी सैनिक परशराम घाडी व बाबुराव मुरकुटे यांनी केले, जिजामाता रथाचे पूजन विजय धामणेकर यांनी केले, तर मिरवणुकीचे उद्घाटन येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या आजी -माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर, चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक वाय. एन. मजूकर, ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. सी. एम. गोरल यांनी केले, यावेळी शिवसंत संजय मोरे, डी. बी. पाटील, एम. वाय. घाडी, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, शिवभक्त महिला व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक येळळूर वेशीपासून ते परमेश्वर नगर पर्यंत काढण्यात आली. ठिकठिकाणी विविध संघ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व महिलांनी मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत केले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *