Monday , September 21 2026
Breaking News

सीमाप्रश्नी उद्या महत्वपूर्ण बैठक!

Spread the love

 

बेळगाव : शिनोळी येथील सीमेवर महाराष्ट्र शासनाने नोडल अधिकारी नियुक्त केल्यानंतर बेळगावसह सीमाभागात सीमाप्रश्नी हालचालीना वेग आला आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी 21 रोजी दुपारी 12:15 वाजता विशेष बैठक बोलावली आहे.

मागील दोन आठवड्यात मंत्री देसाई यांनी बैठक घेतली होती. अनेक विषयावर त्या बैठकीत चर्चा झाली होती त्यानंतर समिती शिष्टमंडळाने कोल्हापूर मुक्कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आता पुन्हा बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी समिती नेते मंडळींना आमंत्रण आले आहे.

या बैठकीत सुप्रीम कोर्टातील खटला लवकरात लवकर गतीने चालू व्हावा यासाठी या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *