Thursday , September 19 2024
Breaking News

LOCAL NEWS

बेकवाड येथे सजावटीच्या माध्यमातून साकारली पंढरीची वारी

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रायोगौडा कुटुंबीयांनी पंढरीच्या वारीतील डेकोरेशनचा सोहळा साकारला आहे. त्यामध्ये रथात आळंदीहून पंढरपूरकडे येणारी पालखी, वरकरींचे रिंगण, वारकऱ्यांकडून होणारा विठ्ठलाचा जयघोष,   वारकऱ्यांकडून खेळली जाणारी फुगडी, विविध उपक्रम यात साकारलेले आहेत. प्लास्टिक बाहुल्या च्या माध्यमातून वारकऱ्यांच्या मूर्ती साकारल्या आहेत. महिला वारकऱ्यांना साड्या,  पुरुषांना …

Read More »

‘श्री’ विसर्जन शक्यतो लवकर करा : महामंडळाचे आवाहन

बेळगाव : राज्यभरात अद्यापही नाईट कर्फ्यू जारी असल्यामुळे शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवारी श्रीगणेश विसर्जना दिवशी रात्री 9 च्या आत शक्यतो दिवसभरात सायंकाळपर्यंत महापालिकेने विसर्जनाची व्यवस्था केलेल्या आपापल्या भागातील नजीकच्या तलाव अथवा विहिरीच्या ठिकाणी श्री मूर्तींचे शांततेत विसर्जन करून सहकार्य करावे, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळाने केले आहे. …

Read More »

मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये देखील आता ‘क्यू आर कोड’

बेंगळुरू : कर्नाटक शिक्षण खात्याने कन्नड व इंग्रजी माध्यमांप्रमाणे आता मराठी माध्यमांच्या आठवी ते दहावी पर्यंतच्या पुस्तकांमध्ये प्रत्येक पाठावर ‘क्यू आर कोड’ उपलब्ध करून दिला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रत्येक पाठाचा अभ्यास करताना संबंधित पाठाचा व्हिडिओ पाहता येणार आहे. कर्नाटक शिक्षण खात्याने यापूर्वी कन्नड व इंग्रजी माध्यमांमध्ये क्यू आर कोडचा …

Read More »

बेळगावात पाणी पुरवठा कर्मचार्‍यांचा संप मागे

बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आणि कर्नाटक नागरी पाणी पुरवठा मंडळाच्या संपकरी कामगारांनी शुक्रवारी आपला संप मागे घेतला. आ. अनिल बेनके यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला. बेळगाव महानगरपालिका आणि कर्नाटक नागरी पाणी पुरवठा मंडळाच्या कामगारांना गेल्या 15 दिवसांपासून सणासुदीच्या काळातही वेतन मिळालेले नाही. ते तातडीने द्यावे तसेच पालिकेतर्फे वेतन अदा …

Read More »

दोघा सराईत चोरट्यांना अटक : 3.10 लाखाचा ऐवज जप्त

बेळगाव : माळमारुती पोलिसांनी दोघा सराईत चोरट्यांच्या जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने, किंमती साहित्य, मोबाईल आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य असा सुमारे 3 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या पथकाने शहर परिसरात चोर्‍या करणार्‍या …

Read More »

पोलीस उपायुक्तांनी केला विविध भागांचा पाहणी दौरा

बेळगाव : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी काल शहरात पाहणी दौरा करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व स्थानिक पंचांशी संवाद साधला. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी काल बुधवारी सायंकाळी शहरातील चव्हाट गल्ली, खडक …

Read More »

उद्यापासून भाजपचे विशेष सेवा अभियान

बेळगाव : येत्या दि. 17 सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने भाजपतर्फे विशेष सेवा आणि समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे राज्य प्रवक्ते अ‍ॅड. एम. बी. जिरली यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि. 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान होणार आहे. यामध्ये …

Read More »

आयएमएतर्फे उद्या भव्य कोरोना लसीकरण शिबिर

बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव जिल्हा शाखा, जिल्हा प्रशासन, जिल्हा वैद्यकीय खाते तसेच तालुका वैद्यकीय खात्यातर्फे शहर परिसरातील विविध 18 खासगी रुग्णालयांत शुक्रवारी दि. 17 रोजी मोफत कोरोना लसीकरण शिबिर आयोजित केल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव शाखेचे सचिव व कॉलेज रोड येथील श्री ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरचे संचालक …

Read More »

जीवनमुखी, फाउंडेशनच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना अन्न व शिष्यवृत्ती वाटप

बेळगांव : अनगोळमधील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात जीवनमुखी, सागर, निखिल व शीतल फौंउंडेशनच्या वतीने करोनाच्या काळात ज्या लोकांना संकटाला सामोरे जावे लागले, अशा लोकांना धान्य वाटप व शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, बीम्सचे रेडिओलॉजिस्ट डॉ. ईराण्णा आर पल्लेद, …

Read More »

बेळगावात 17 सप्टेंबर रोजी तीन लाख जणांना लसीकरण

बेळगाव : कर्नाटक सरकारतर्फे येत्या शुक्रवार दि. 17 सप्टेंबर रोजी विशेष राज्यव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार असून या एका दिवसात 25 ते 30 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. या विशेष राज्यव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यात 3 लाख डोस …

Read More »