Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावच्या श्री ज्योतिर्लिंग मंदिराला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची खास भेट

Spread the love

 

बेळगाव : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूरच्या कार्यालयीन कर्मचारी वर्गाने काल बुधवारी शिवबसवनगर बेळगाव येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिराला खास सदिच्छा भेट देऊन मंदिराचे लाकडी काम आणि शिस्तबद्ध नियोजनाची प्रशंसा केली.

शिवबसवनगर येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिराची वास्तू, गाभारा वगैरेचे लाकडी काम, नवरंग आदींची मंदिराला भेट देणाऱ्या भक्तमंडळींकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली जाते. ही प्रशंसा -वजा चर्चा कानावर गेल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूरच्या कार्यालयीन कर्मचारीवर्गाने श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळ बेळगावचे प्राचार्य आनंद आपटेकर यांच्याशी संपर्क साधला.

तेंव्हा प्राचार्य आपटेकर यांनी त्यांना मंदिराच्या भेटीचे निमंत्रण दिले. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूरचे लेखापाल धैर्यशील तीवले, धनाजी गुरव, अनिरुद्ध गुरव, प्रल्हाद सावंत आणि सागर खेडेकर यांनी काल बुधवारी शिवबसवनगर येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिराला सदिच्छा भेट दिली.

मंदिराला भेट देणाऱ्या सर्वांचे प्राचार्य आनंद आपटेकर यांनी स्वागत केले. याप्रसंगी मंदिराच्या पुजाऱ्यांसह जयवंत काकतीकर व इतर उपस्थित होते. देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनी प्रथम देवदर्शन घेतले. यावेळी मंदिराचे पुजारी लक्ष्मण बुणे यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला श्रीफळ देऊन आशीर्वाद दिले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण मंदिराची पाहणी करून मंदिराची वास्तू, गाभारा वगैरेचे लाकडी काम, नवरंग या सर्व गोष्टींसह पूजेच्या शिस्तबद्ध नियोजनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. कोल्हापूर श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे.

हे काम दर्जेदार उत्कृष्ट व्हावे यासाठी त्यामध्ये इतर मंदिरांमधील वेगळ्या नाविन्यपूर्ण कामाचा अंतर्भाव केला जाणार आहे. त्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कोल्हापूरचे सदस्य व कर्मचारी अलीकडे विविध मंदिरांना भेटी देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कालची सदिच्छा भेट होती, अशी माहिती प्राचार्य आनंद आपटेकर यांनी बेळगाव वार्ताला दिली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *