Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर विद्यानगरात विकास कामाला अडथळा आणणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा; नागरिकांची मागणी

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विद्यानगरातील सर्वे नंबर ९२/२ मध्ये नगरपंचायतीकडून गटारी, रस्ते आदी विकास कामे केली जात आहेत. असे असताना विद्या नगरातील रहिवासी निळू पाटील हे नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसराना व इजिनिअरना मोबाईल व्दारे विद्या नगरात विकास काम का करता. सर्वे नंबर ९२/२ ही जमिन सरकार जमा झाली आहे. जर विकास कामे केल्यास नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी देऊन अधिकाऱ्यांसह विद्या नगरातील जवळपास २०० रहिवासी वर्गाला मानसिक त्रास देत आहे. त्यामुळे संबंधीत व्यक्तीवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन पोलिस स्टेशन, तहसीलदार, व नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसराना देण्यात आले.

निवेदन देताना अन्थोनी लोबो, मारूती गुरव, सी वाय मादार, गणपती पाटील, बसवराज गडाद, गणेश गावडा, परशराम चोपडे, प्रकाश पाटील, परशराम गुरव, मनोहर दळवी, कांचन पाटील, सारीका गुरव, राजश्री पाटील, अरूण गुरव, आदी नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *