Monday , September 21 2026
Breaking News

समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांचा वाढदिवस साजरा

Spread the love

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे नेते, श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते रमाकांत कोंडुसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

रमाकांत कोंडुसकर यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेक संस्था-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी व्यक्तिशः भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन करत पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनात ज्या पद्धतीने कार्य करते त्याची पोचपावती हि मिळतेच.

आज रमाकांत कोंडुसकरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर झालेल्या शुभेच्छांचा वर्षाव पाहता समाजाने त्यांच्या एकंदर कार्याची दखल घेतली असा संदेश समाजात जात आहे.

रामलिंग खिंड गल्ली येथील समिती कार्यालयात राजहंसगडावर होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भातील पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून समिती नेते, तालुका आणि शहर समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दररोज बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. समिती नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज रमाकांत कोंडुसकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, गुणवंत पाटील, कृष्णा हुंदरे, एम. जी. पाटील, मदन बामणे, दत्ता जाधव, पुंडलिक पावशे, सचिन दळवी, रामचंद्र मोदगेकर, डी बी पाटील, आदींच्या उपस्थितीत रमाकांत कोंडुसकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *