Wednesday , April 22 2026
Breaking News

दुग्धाभिषेक सोहळ्यास मुख्यमंत्री बोम्माई यांच्याकडून विघ्न!

Spread the love

 

बेळगाव : राजकीय स्वार्थ समोर ठेवून राष्ट्रीय पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून बेळगावमध्ये दोन राष्ट्रीय पक्षामध्ये श्रेयवादाचे राजकारण केले गेले. या गलिच्छ राजकारणाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने 19 मार्च रोजी राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याची जनजागृती आणि जनतेचा प्रतिसाद पाहून आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीकडे जनता आकर्षित होईल या भीतीने बिथरलेल्या मुख्यमंत्री बोम्माई यांनी या सोहळ्यात आडकाठी आणण्याची वल्गना सुरू केली आहे.
19 मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमात प्रशासकीय दबाव आणण्यात येणार असल्याचे संकेत आज मुख्यमंत्री बोम्माई यांनी दिले आहेत. बेळगावातील बसवेश्वर महाराजांच्या कांस्य मूर्तीच्या पायाभरणी समारंभासाठी बोम्माई बेळगावात आले होते त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, जिल्हाधिकारी व पोलीस विभागाशी आपण चर्चा करणार. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे येत्या 19 मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमास हेतुपुरस्सर आडकाठी आणणार व मराठी भाषिकांवर शासकीय दबावतंत्राचा वापर होणार असण्याची चिन्हे दिसत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला आपला पराभव स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे दस्तावलेल्या बोम्माईंच्या विविध मतदारसंघात फेऱ्या वाढल्या आहेत त्याच धर्तीवर बेळगाव दौऱ्यात देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहेत. राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचे लोकार्पण देखील मराठी मराठी भाषिकांना आकर्षित करण्यासाठी केलेला प्रयत्न होता. मराठी भाषिक जनतेला खूष करण्यासाठी शासकीय शिष्टाचार पाळून लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला. मात्र दोन दोन वेळा समारंभ करून महाराजांचा अपमान केल्यामुळे संतप्त शिवभक्तांनी दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे राष्ट्रीय पक्ष्याचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. भारतातील प्रत्येक नागरिकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. दुग्धाभिषेक व शुद्धीकरण करून मराठी भाषिक शिवभक्त आपल्या भावना व्यक्त करीत आहेत शिवरयांप्रति असलेली श्रध्दा जोपासत आहेत त्यामुळे हा सोहळा साजरा करण्यापासून रोखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र कर्नाटक शासनाने नेहमीप्रमाणे घटनेची पायमल्ली करत मराठी भाषिकांना रोखण्याचा प्रयत्न केला तर या सरकारला जनतेच्या रोशास सामोरे जावे लागेल हे नक्की..

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *