Monday , September 21 2026
Breaking News

येळ्ळूर विभाग समितीकडून दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी पंचगंगेचे जल

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने येळ्ळूर राजहंसगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराज दुग्धाभिषेक सोहळा रविवार दिनांक 19 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर सात नद्यांच्या जलाशयाने जलाभिषेक करून महाराजांना मुजरा करावयाचा आहे. त्या अनुषंगाने आज येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी सकाळी सात वाजता येळ्ळूरहून कोल्हापूर येथील पाच नद्यांचा संगम आसलेल्या पंचगंगा नदीच्या जलपूजन करून कलश पुजनाने छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयघोषात नरसोबावाडी येथील पंचगंगा, वारणा आणि कृष्णा नदी तिहेरी संगमावर विधिवत पूजा करून गुरूदेव दत्तांचा आशिर्वाद घेऊन दुधगंगा, वेदगंगा नद्यांच्या जलाशय घेऊन खानापूर येथील मलप्रभा नदीचे जल आणण्यात येणार आहे. जल आणण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, सरचिटणीस प्रकाश अष्टेकर, उपाध्यक्ष राजु पावले, महेश जुवेकर, दता उघाडे यांनी पाच कलशातून जल घेऊन येत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *