Monday , September 21 2026
Breaking News

जिजामाता महिला सहकारी बँकेच्या चेअरमनपदी उचगावच्या सौ. भाविकाराणी होनगेकर

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटकातील पहिली महिला सहकारी बँक व सहकार क्षेत्रातील एक अग्रेसर असलेल्या बेळगाव येथील जिजामाता महिला सहकारी बँकेच्या चेअरमनपदी उचगावच्या सौ. भाविकाराणी जीवनराज होनगेकर यांची संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
कर्नाटकातील पहिली महिला सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या व सहकार क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या संस्थापक कै. अर्जुनराव घोरपडे यांनी सन 1974 साली स्थापना केलेल्या जिजामाता महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सौ. भाविकाराणी जीवनराज होनगेकर यांची सन 2023 ते 2025 या साला पर्यंतच्या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेनंतर नूतन अध्यक्षाचे बँकेचे व्यवस्थापक नितीन आनंदाचे व संचालक मंडळाकडून अभिनंदन करण्यात आले. सौ. भाविकाराणी जीवनराज होनगेकर यांनी सन २००८ पासून म्हणजेच गेली पंधरा वर्षे त्यांनी बँकेच्या संचालक मंडळामध्ये बँकेच्या सेवेत कार्यरत आहेत. भाविकाराणी जीवनराज होणगेकर ह्या उचगाव येथील प्रतिष्ठित नागरिक आणि बेळगाव येथील मराठा बँकेचे माजी चेअरमन बेळगाव तसेच मार्केट यार्ड मधील प्रसिद्ध अडत व्यापारी आणि बेळगाव तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक लक्ष्मणराव होनगेकर यांच्या त्या स्नुषा होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *