Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

प्रगतिशील लेखक संघातर्फे आज शाहू जयंती

  बेळगाव : प्रगतिशील लेखक संघातर्फे सोमवारी (ता. २६) छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी संघाच्या सदस्या रोशनी हुंदरे व सदस्य मधु पाटील यांची शाहू महाराज यांच्या जीवनावर भाषणे होणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहावे, असे …

Read More »

डेंगीच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर ग्रामपंचायतीतर्फे खबरदारीचे आवाहन

  येळ्ळूर : येळ्ळूर गावांत गेल्या काही दिवसांपासून डेंगी व टायफाईडची साथ सुरू आहे. गावामध्ये अनेक रुग्ण असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे. याला येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. रमेश दंडगी यांनीही दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने संपूर्ण गावांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना जागरुक करण्यासह खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. …

Read More »

गाणिग अभिवृद्धी संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

  बेळगाव : गाणिग समाज अभिवृद्धी संघाच्यावतीने २०२२-२३ या  शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नुकताच पार पडला. नेहरूनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र काकती होते. समाजाचे अध्यक्ष प्रकाश बाळेकुंद्री यांनी एस. …

Read More »

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाला प्रतिनिधित्व हवेच : श्यामसुंदर गायकवाड यांची मागणी

  कित्तूर : कर्नाटक राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाने भारतीय जनता पक्षाला नेहमीच खंबीर साथ दिली आहे. राज्यातील भाजपच्या यशात मराठा समाजाचा मोठा वाटा आहे. याची जाणीव ठेवून भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाला उत्तर कन्नडा आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी द्यावी. मी स्वतः उत्तर कन्नडा लोकसभा मतदारसंघातून …

Read More »

संतोष दरेकर यांच्याकडून पुरस्काराची रक्कम गरीब रुग्णाच्या लिव्हर ट्रान्सप्लांटशनसाठी

  बेळगाव : अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी धावून जाणारे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष संतोष दरेकर यांच्या निस्वार्थी कार्याची दखल फ्रिमसन्स लॉज व्हिक्टोरिया क्रमांक नऊने घेतली आहे. दरेकर यांच्या समाजसेवेची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दहा हजार रु रोख, शाल आणि तुळशीचे रोप देऊन फ्रिमसन्स लॉज व्हिक्टोरियाच्या पदाधिकार्‍यांनी दरेकर यांचा …

Read More »

सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी यासाठी वकिलांशी चर्चा करणार

  समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली जयंत पाटील यांची भेट बेळगाव : सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील मंगळवारी (ता. २७) दिल्ली येथे वकिलांशी चर्चा करणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर येथे माजी मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी मे महिन्यात झालेल्या …

Read More »

सीएससी केंद्रांना सेवासिंधू सुविधा उपलब्ध करू देण्याची मागणी

  बेळगाव : सरकारी योजनांचा लाभ लोकांच्या दारात पोहोचवण्यात सीएससी केंद्रांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्य सरकारने यापूर्वीच राबविलेल्या लोकप्रिय योजनांच्या अर्जांना सेवासिंधूमध्ये परवानगी देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे सेवासिंधूमध्ये ग्रामवन आणि कर्नाटक वन केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सीएससी केंद्रांना ती देण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने केवळ ग्रामीण …

Read More »

अम्माभगवान सेवा समितीच्या वतीने उद्या कल्याणोत्सवाचे आयोजन

  बेळगाव : सदाशिवनगर येथील श्री परमज्योति अम्माभगवान ध्यानमंदिर मध्ये अम्माभगवान सेवा समितीच्या वतीने २५ जून २०२३ रोजी कल्याणोत्सव साजरा करण्यात येणार असून सकाळी आठ वाजता चन्नम्मा चौकातील गणपती मंदिरपासून क्लब रोड, विश्वेश्वरय्यानगर येथून सदाशिव नगर येथील ध्यानमंदिर पर्यंत श्री परमज्योति अम्माभगवान श्रीमुर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर कल्याणोत्सव म्हणजेच …

Read More »

बेळगावात पावसासाठी मुस्लिम समुदायाची प्रार्थना

  बेळगाव : पाऊस लांबल्याने सर्वत्र हाहाकार माजला आहे. त्यामुळे सगळीकडे पावसासाठी प्रार्थना सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात आज मुस्लिम समुदायातर्फे पावसासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. बेळगाव येथील ईदगाह मैदानावर शनिवारी मुस्लिमांनी सामूहिक नमाज अदा केली. बेळगाव उत्तर काँग्रेसचे आमदार आसिफ सेठ व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामूहिक प्रार्थनेदरम्यान …

Read More »

घटप्रभा नदीतील अनेक मासे मृत्युमुखी!

  बेळगाव : यावर्षी मान्सून लांबल्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच नद्या, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला पिण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याची झळ जलचर प्राण्यांना देखील बसली आहे. नदी, नाले कोरडे पडल्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील घटप्रभा नदी …

Read More »