Friday , November 6 2026
Breaking News

गाणिग अभिवृद्धी संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Spread the love

 

बेळगाव : गाणिग समाज अभिवृद्धी संघाच्यावतीने २०२२-२३ या  शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नुकताच पार पडला. नेहरूनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र काकती होते. समाजाचे अध्यक्ष प्रकाश बाळेकुंद्री यांनी एस. जी. बाळेकुंद्री, डॉ. विजया यांच्यासारख्या महान व्यक्तीविषयी माहिती दिली. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी सुजाता बाळेकुंद्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नेत्रावती बाळेकुंद्री यांनी आयएएस, केएएस प्रशिक्षणाबाबत माहिती दिली.

एकूण ७४ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, गाणिग देवतेचा फोटो, पुस्तके, रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी संजय बाळेकुंद्री, विद्याधर तेरणी, संजीव बाळेकुंद्री, आनंद बागेवाडी, सदानंद हलगी यासह इतर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *