Sunday , September 20 2026
Breaking News

डेंगीच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर ग्रामपंचायतीतर्फे खबरदारीचे आवाहन

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर गावांत गेल्या काही दिवसांपासून डेंगी व टायफाईडची साथ सुरू आहे. गावामध्ये अनेक रुग्ण असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे. याला येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. रमेश दंडगी यांनीही दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने संपूर्ण गावांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना जागरुक करण्यासह खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांनी पाणी गरम करून प्यावे. पाण्याचे साठा न करता पाणी नियमित बदलावे. घर व परिसरात टाकाऊ वस्तूंमध्ये साठलेले पाणी काढून टाकावे. घराच्या परिसरात नारळाच्या करट्या, जुने टायर, पाण्याच्या बाटल्या, लग्न समारंभात वापरलेली प्लास्टिक ग्लासे, पत्रावळ्या अशा अनेक टाकाऊ वस्तूंमध्ये पाणी साठलेले असते… अशा पाण्यामध्येच डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असते. त्यामुळे घरचा परिसर स्वच्छ ठेवणे हाच एकवर उपाय आहे. येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामपंचायत, अंगणवाडी व अशा कार्यकर्त्या यांच्या. सहकार्यातून घरोघरी जाऊन डेंगीबद्दल माहिती देण्यात येत आहे. घरातील पाण्याचे साठेही तपासण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावे, असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *