Monday , December 23 2024
Breaking News

LOCAL NEWS

पुन्हा नि:पक्षपातीपणे घ्या निवडणुका

वॉर्ड क्र. 31 मधील उमेदवारांची मागणी बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 31 मध्ये लोकशाहीच्या मुल्यांना हरताळ फासून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून त्याची नि:पक्ष चौकशी करून पुन्हा पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी वॉर्ड क्र. 31 च्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवार राजश्री हावळ, काँग्रेस उमेदवार …

Read More »

जीवनावश्यक किट्सचा बेकायदा साठा : काँग्रेस आक्रमक

बेळगाव : लॉकडाऊन काळात बांधकाम कामगारांसाठी देण्यात आलेल्या जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वितरण करण्याऐवजी त्यांचा बेकायदेशीर साठा करण्यात आल्याचा प्रकार बेळगाव दक्षिण मतदारसंघातील नव्याने निवडून आलेल्या एका पालिका सदस्याच्या मालकीच्या घरात उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आवाज उठवून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शहापूर पोलिसांकडे …

Read More »

मराठी माहिती फलक उखडून टाकल्याने संताप!

बेळगाव : मराठीचा पोटशूळ असलेल्या कांही समाजकंटकांनी श्री गणेश विसर्जनाच्या धामधुमीचा गैरफायदा घेऊन तानाजी गल्ली समर्थनगर येथील ज्येष्ठ पंच मंडळ व भगवा रक्षक युवक मंडळाचे मराठीतील माहिती फलक उखडून फेकल्याचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. बेळगाव शहरातील समर्थनगर येथील प्रभाग क्रमांक 15 मधील तानाजी गल्लीच्या …

Read More »

यल्लम्मा देवस्थान सदस्य निवडीबद्दल सुनील पुजारी यांचा सत्कार

बेळगाव : वडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील रघु पुजारी यांची सौंदत्ती यल्लम्मा देवस्थान ट्रस्टवर सरकार नियुक्त सदस्य पदी राज्य सरकारतर्फे निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा अन्नपूर्णेश्वरी मंदिर ट्रस्ट व मित्रमंडळी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविराज हेगडे होते.सौंदत्ती यल्लम्मा देवस्थान ट्रस्टवर सरकार नियुक्त सदस्य पदी 9 जणांची निवड …

Read More »

शहापुरात विविध संघ संस्थांच्यावतीने आरोग्य उत्सव साजरा

बेळगाव : कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे औचित्य साधून सलग दुसऱ्या वर्षी विविध संघ संस्थांच्यावतीने आरोग्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्री दुर्गा माता महिला स्वसहाय्य संघ, मुक्तिधाम, फेसबुक फ्रेंड सर्कल, साहेब फाउंडेशन, प्रोत्साह फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्वोदय कॉलनी येथे तर दुपारी दोन ते …

Read More »

बाप्पाच्या विसर्जनासाठी शहरातील तलाव सज्ज

बेळगाव : आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला उद्या रविवारी 19 सप्टेंबर रोजी मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला जाणार असून नाझर कॅम्प येथील विसर्जन तलाव वगळता शहर उपनगरातील विविध 7 तलाव श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर कांहीनी परंपरेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले …

Read More »

भाजप वगळून सर्वपक्षांच्या प्रतिनिधींसह महाराष्ट्र एकीकरण समिती सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

माजी महापौर सरिता पाटील बेळगाव : बेळगाव महापालिका निवडणुकीत प्रचंड गैरकारभार झाला आहे. या विरोधात तेथील भाजप वगळून सर्वपक्षांच्या प्रतिनिधींसह महाराष्ट्र एकीकरण समिती सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या न्यायालयीन लढ्यात आम्हाला महाराष्ट्र सरकारने सर्व प्रकारची मदत करावी, अशी अपेक्षा बेळगाव महापालिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी महापौर सरिता पाटील यांनी …

Read More »

लसीकरणात बेळगाव देशात द्वितीय!

बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काल 17 सप्टेंबर रोजी राबविण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक मेगा लसीकरण अभियानात बेळगाव जिल्ह्याने संपूर्ण देशात दुसरा क्रमांक पटकावून अत्युत्तम कामगिरी बजावली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली. सदर मेगा लसीकरण अभियानामध्ये बृहन बेंगलोर महानगरपालिकेने 4,09,977 जणांचे लसीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला …

Read More »

बेळगाव ग्रामीण मतदारसंघात विविध विकासकामांचा शुभारंभ

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघात बुधवारी विविध विकासकामांना चालना देण्यात आली. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर बेंगळुरूमध्ये विधानसभा अधिवेशनात सहभागी झाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधीनी विकासकामांचा शुभारंभ केला. मतदारसंघातील कुद्रेमानी येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 11 लाख रुपये निधीतून नूतन इमारत बांधकामाचे भूमीपूजन स्थानिक लोकप्रतिनिधी व युवा काँग्रेस नेते मृणाल …

Read More »

महिला व मुलींना संरक्षण द्या : जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

बेळगाव : महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कडक शासन करण्याबरोबरच बेळगाव शहर परिसरात विविध गुन्ह्यांसह महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्यामुळे प्रशासनाने प्रामुख्याने महिला व मुलींच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी मानवाधिकार लोककल्याण व भ्रष्टाचार विरोधी समितीने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. मानवाधिकार लोककल्याण व भ्रष्टाचार विरोधी समितीचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष नियाज …

Read More »