बेळगाव : समर्थ नगर चौथा क्रॉस, वॉर्ड क्रमांक १५ येथे नवीन पेव्हर रोडच्या बांधकामाच्या कामाचा शुभारंभ पूजाविधीने करण्यात आला. सदर रस्ता विकासकाम नगरसेविका सौ. नेत्रावती विनोद भागवत यांच्या निधीतून करण्यात येत आहे. गेल्या तब्बल २० वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्ती व विकासाची प्रतीक्षा नागरिक करत होते. अखेर हा प्रश्न मार्गी …
Read More »LOCAL NEWS
गर्भवती मुलीची बापाने केली निर्घृण हत्या; हुबळीतील दुर्दैवी घटना
हुबळी : प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापानेच सात महिन्यांची गर्भवती असलेल्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हुबळी तालुक्यातील इनाम वीरापूर गावात घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत मान्या पाटील (वय 20) या सात महिन्यांच्या गर्भवती तरुणीचा मृत्यू झाला आहे. मान्या हिने इनाम वीरापूर गावातील …
Read More »भावी पिढी घडवण्याचे काम शिक्षकांबरोबर पालकांचे : खासदार जगदीश शेट्टर यांचे प्रतिपादन
बेळगाव : अलीकडच्या काळात पालकांच्या मुलांबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. याकडे लक्ष दिल्यास पालकांनी मुलांना भावी जीवनाच्या वाटा चोखाळण्याचे स्वातंत्र्य द्यावे.भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांबरोबर पालकांचेही असल्याचे प्रतिपादन,माजी मुख्यमंत्री आणि बेळगावचे विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांनी केले. कॅम्प येथील बी.के. मॉडल हायस्कूलच्या शतक महोत्सव कार्यक्रमात आज खासदार जगदीश शेट्टर आणि …
Read More »कलबुर्गी येथील मठात स्वामीजींनी केला हवेत गोळीबार
कलबुर्गी : कलबुर्गी येथे शांतलिंग स्वामीजींनी मठाच्या आवारात उभे राहून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. येथील उडचन गावातील हिरेमठ शांतलिंग स्वामीजी काही दिवसांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत आले होते आणि मठात गोंधळ घातला होता. यामुळे भाविक संतप्त झाले आणि त्यांनी स्वामीजींना मठाबाहेर काढले. नवीन मठाधीश नियुक्त करण्याबाबतही चर्चा सुरू झाली. …
Read More »खासदार धैर्यशील माने यांच्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार : करवे
बेळगाव (वार्ता) : गेल्या पन्नास वर्षांपासून महाराष्ट्रातील नेते बेळगावमध्ये येऊन चिथावणीखोर भाषणे देऊन भाषिक द्वेषाची बीजे पेरत आहेत. कर्नाटकातील नागरिक राज्योत्सव साजरा करतात. तेव्हा समिती बेळगावमध्ये काळा दिवस पाळतात आणि बेळगावमधील अधिवेशनादरम्यान महामेळावा भरवणारे राज्यद्रोही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात आमंत्रित करून त्यांना चिथावणीखोर भाषणे करायला लावतात. …
Read More »कोल्हापूरच्या ‘ग्वाही’, बेळगावच्या ‘झाले मोकळे आभाळ’ एकांकिकेची बाजी
बेळगाव : १४ व्या कॅपिटल वन करंडक एकांकिका स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बेळगावात अतिशय उत्साही वातावरणात पार पडला. या स्पर्धेच्या खुल्या गटात कोल्हापूरच्या डी.आर.के.सी. कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ‘ग्वाही’ एकांकिकेने, तर शालेय विद्यार्थ्यांच्या जिल्हा मर्यादित गटात वरेरकर नाट्य संघ बेळगावच्या ‘झाले मोकळे आभाळ’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावून बाजी …
Read More »जागतिक शेतकरी परिषदेसाठी जाणारे वाहन पलटी; ३० हून अधिक शेतकरी जखमी
बेळगाव : म्हैसूर येथे आयोजित जागतिक शेतकरी परिषदेसाठी निघालेल्या शेतकऱ्यांच्या वाहनाचा बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात भीषण अपघात झाला. जालिकोप्प गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन उलटून ३० हून अधिक शेतकरी जखमी झाले आहेत. म्हैसूरमधील कार्यक्रमासाठी बैलहोंगल तालुक्यातील गरजू येथील शेतकरी अत्यंत उत्साहाने निघाले होते. मात्र जालिकोप्प गावाजवळ पोहोचल्यानंतर चालकाचे …
Read More »नारायण बरमणी प्रकरणावरून भीमप्पा गडाद यांचा पोलीस प्रशासनावर हल्लाबोल
बेळगाव : धारवाडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नारायण बरमणी यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी हात उचलल्याच्या घटनेचा निषेध करत भीमप्पा गडाद यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव येथील पत्रकार परिषदेत त्यांनी पोलीस विभागाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या एका मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान नारायण बरमणी यांच्यावर हात उचलून त्यांना धमकावले होते, …
Read More »सातारा संमेलनात सीमा प्रश्नाचा ठराव घेण्याचे आश्वासन
बेळगाव : सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बेळगाव सीमा प्रश्नी ठराव घेण्याचे ठोस आश्वासन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी दिले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठवलेल्या पत्रात जोशी यांनी आश्वासन दिले आहे या अगोदर बेळगाव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पत्र घेण्याची …
Read More »बृहन महाराष्ट्र मंडळ शतक महोत्सवी वर्ष, बेळगावात ‘हे बंध रेशमाचे’ संगीत नाटकाचे आयोजन
बेळगाव : महाराष्ट्र बाहेर विखुरलेल्या मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी कार्यरत असलेले बृहन महाराष्ट्र मंडळ यावर्षी शतक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. शतक महोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या बेळगाव शाखेच्या वतीने बुधवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 5 वाजता कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात भरत नाट्य संशोधन मंदिर पुणे प्रस्तुत तुफान गाजलेल्या ‘हे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta