बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे उद्या शनिवार दि. १३ ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता कुलकर्णी गल्ली येथील पद्मावती चेंबर मधील पत्रकार संघाच्या कार्यालयात सदर कार्यक्रम होणार आहे. पत्रकार संघाचे सदस्य, हितचिंतक आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, …
Read More »LOCAL NEWS
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘हर घर तिरंगा’ उपक्रमातंर्गत जनजागृती रॅली
बेळगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकविण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच शहरात तसेच तालुक्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा यासाठी कॅम्प येथील सेंट जोसेफ शाळेच्यावतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत 100 तिरंगा ध्वज हातात घेवून विद्यार्थ्यांनी …
Read More »75 मीटर लांबीची भव्य तिरंगा रॅली
बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवासाठी संपूर्ण देशात नवचैतन्य पसरले आहे. देशाच्या कानाकोपर्यात तिरंगा झेंडे फडकत आहेत. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणार्या लाखो स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्याचे एक महान कार्य सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात आज बेळगाव महानगरपालिकेच्या सहकार्याने दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशाल तिरंगा रॅली काढण्यात आली. धर्मवीर संभाजी मैदान, …
Read More »पर्यावरण जतन करण्याची जबाबदारी तरुण पिढीवर
आ. श्रीमंत पाटील : स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवानिमित्त ऐनापुरला रोपवाटप अथणी (प्रतिनिधी) : पर्यावरण व निसर्गसौंदर्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे निसर्गाचे सौंदर्य करायचे असेल तर प्रत्येकाने एक तरी रोपटे लावले पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केले. आमदार पाटील यांच्या प्रयत्नाने ऐनापुर येथे यापूर्वीच ट्री …
Read More »“त्या” 22 शाळांना उद्या पुन्हा सुट्टी
बेळगाव : बेळगावात दिसलेला बिबट्या अद्याप सापडला नसल्याने शुक्रवारी दि. 12 रोजी पुन्हा “त्या” 22 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. डीडीपीआय बसवराज नलतवाड आणि बीईओ रवी बजंत्री यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. बेळगाव शहर आणि ग्रामीण शैक्षणिक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शाळांना शुक्रवारी (१२ ऑगस्ट) सुट्टी वाढवण्यात आली …
Read More »एसीबीची स्थापना उच्च न्यायालयाकडून रद्द
लोकायुक्ताना प्रकरणांच्या चौकशीचे अधिकार बंगळुरू : राज्य सरकारला मोठा झटका देत, उच्च न्यायालयाने लोकायुक्त पोलिस शाखेला लोक सेवकांवरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे अधिकार बहाल केले. राज्य सरकारला परत एक मोठा धक्का देताना, कर्नाटक उच्च न्यायालयाने 2016 चा लाचलुचपत प्रतिबंधक पथक (एसीबी) स्थापन करण्याचा निर्णय रद्द केला. कर्नाटक लोकायुक्त कायदा, …
Read More »प्रा. श्री. बालाजी डी. आळंदे यांना पीएचडी पदवी प्रदान
बेळगाव : प्रा. श्री. बालाजी डी. आळंदे यांना भौतिकशास्त्र विभाग RCUB च्या संगोळी रायन्ना प्रथम श्रेणीतील घटक महाविद्यालय बेळगांव कर्नाटकतर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली. “लेझर डाईझच्या अल्ट्राफास्ट रिलॅक्ससेशन डायनॅमिक्सचा अभ्यास” या विषयावर भौतिकशास्त्रातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी 4 ऑगस्ट 2022 राजी प्रदान करण्यात आली. गुलबर्गा विद्यापीठ कलबुर्गी येथील …
Read More »प्रेम प्रकरणातून धार्मिक हिंसाचार; दोघांचा मृत्यू
कोप्पळ : कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील हुलीहायडर गावात दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोघांना मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पाशा वाली (22) आणि येनाकापा तलवाड (60), असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाकडून परिसरात कलम १४४ लागू करण्यात …
Read More »15 ऑगस्ट रोजी मोठे रक्तदान शिबीर
बेळगाव : गेल्या 14 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन आणि बेळगाव येथील उप औषध नियंत्रक यांच्या प्रादेशिक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट रोजी महावीर भवन, बेळगावी येथे सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असे जितो फाउंडेशनच्या रक्तदान शिबिर समन्वयक …
Read More »भारतीय प्रजादलाच्या अध्यक्षपदी दीपक हळदणकर यांची निवड
बेळगाव : बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी एकत्र येऊन भारतीय प्रजादल या नावाची सामाजिक संघटना स्थापन केली आहे. या भारतीय प्रजादलाच्या अध्यक्षपदी श्री. दीपक दत्तात्रय हळदणकर यांची नेमणूक करण्यात आली. या भारतीय प्रजादलाच्या माध्यमातून गरीब निराधार जनतेची सेवा करणे तसेच जनावरांची सेवा करणे, युवकांना व्यसनापासून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta