बेळगाव : कर्नाटक सरकारला मराठी भाषकांची ताकद दाखवून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 19 डिसेंबरला महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी कर्नाटक सरकारतर्फे बेळगावात होणाऱ्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन केले जाते. महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. अधिवेशन काळात …
Read More »LOCAL NEWS
14 डिसेंबरला अमित शहा दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार
नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उपस्थित खासदारांनी सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अत्याचाराची माहिती गृहमंत्र्यांना दिली. त्याचबरोबर सीमा प्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री तणावाची परिस्थिती निर्माण करत असल्याची तक्रार ही त्यांनी केली. यावेळी बोलताना …
Read More »जानेवारीमध्ये महापौर-उपमहापौर निवड : अभय पाटील
बेळगाव : जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगावच्या महापौर-उपमहापौरांची निवडणूक होईल, बेळगाव मनपाच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाचा झेंडा मनपावर फडकेल, अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी दिली. बेळगाव महानगरपालिकेवर निवडून आलेल्या भाजप नगरसेवकांची आ. अभय पाटील यांनी आज शुक्रवारी बैठक घेतली. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. …
Read More »हाॅकी बेळगाव आंतर शालेय काॅलेज हाॅकी स्पर्धेचा शुभारंभ
बेळगांव : हाॅकी बेळगावतर्फे आंतरशालेय व काॅलेज हाॅकी स्पर्धांचे आयोजन दि. 9 ते 11 डिसेंबर नेताजी सुभाष चंद्र बोस (लेले ग्राऊंड) येथे आयोजन करण्यात आले असून आज सकाळी शुभारंभ करण्यात आला. यावेळी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, शिवाजी जाधव, धारु चाळके, उत्तम शिंदे, रमेश गुर्जर, खलीद बेपारी, नामदेव …
Read More »अवैध धंद्यात गुंतलेल्या एका माजी नगरसेवकासह 5 जणांना बेळगावातून तडीपार
बेळगाव : बेकायदा अवैध धंद्यात गुंतलेल्या एका माजी नगरसेवकासह 5 जणांना बेळगावतून तडीपार करण्यात आले आहे. असा आदेश कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी रवींद्र गडादी यांनी बजावला आहे. मार्केट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून मोहम्मदशफी मोदीनसाब ताशीलदार (वय 68, रा. खंजर गल्ली) आणि इजारअहमद महंमदइसाक नेसरीकर …
Read More »दोन्ही राज्यातील भाजप सरकार सीमावाद वाढवत आहे
सिध्दरामय्यांचा आरोप, महाजन अहवालाचे तुणतुणे बंगळूर : बेळगावसह सीमा भाग सामान्य स्थितीत परत येत असतानाच, माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाने हा वाद विकोपाला नेला असल्याचा आरोप केला व आश्चर्य व्यक्त केले. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात भाजपची सत्ता आहे. या …
Read More »हाॅकी बेळगावतर्फे आंतर शालेय काॅलेज हाॅकी स्पर्धा आजपासून
बेळगांव : हाॅकी बेळगावतर्फे आंतरशालेय व काॅलेज हाॅकी स्पर्धांचे आयोजन दि. 9 ते 11 डिसेंबर नेताजी सुभाष चंद्र बोस ( लेले ग्राऊंड ) येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत इस्लामिया, बाशिबान, मदानी, द्यान मंदीर, भंडारी, हेरवाडकर, कॅंटोनमेंट, शानभाग, सेंट जाॅन, जी जी चिटणीस, फोनिक्स, महाविद्यालय तसेच जीएसएस, गोगटे, …
Read More »…म्हणे महाराष्ट्रात कन्नडिगांना धोका!
बेळगाव : सीमाप्रश्नावरून हिरेबागेवाडी टोल नाक्यावर उच्छाद मांडून दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण निर्माण केलेल्या कर्नाटक रक्षण वेदिकेने महाराष्ट्रात कन्नडिगांना धोका असल्याचा कांगावा करत त्यांना सुरक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली आहे. त्यामुळे चोराच्या उलट्या बोंबा! या म्हणीचा प्रत्यय आला आहे. बेळगावात पोलिसांनी प्रवेशबंदी करूनही दोनच दिवसांपूर्वी बेळगावातील …
Read More »गुजरातमध्ये भाजपचा विजय; बेळगावमध्ये विजयोत्सव!
बेळगाव : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर बेळगावात आज भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयोत्सव साजरा केला. गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय संपादन केला आहे. त्या आनंदात बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी आज विजयोत्सव साजरा केला. शहरातील चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरात भाजप कार्यकर्त्यांनी पूजा केली. त्यानंतर मिठाई वाटून …
Read More »दोन कारमध्ये भीषण अपघात : भाऊ-बहिणीचा जागीच मृत्यू
मुडलगी : गुर्लापूरजवळील मुधोळ-निपाणी राज्य महामार्गावर बुधवारी रात्री टाटा टियागो कार आणि एर्टीगा कार यांच्यात झालेल्या अपघातात मोठा भाऊ आणि लहान बहिणीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. रायबाग तालुक्यातील कप्पाळगुड्डी गावातील दुंडाप्पा अडिवेप्पा बडिगेर (३४) आणि बहीण भाग्यश्री नवीन कंभार (२२) हे दोघे बुधवारी रात्री धारवाडहून कप्पाळगुड्डी या मूळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta