Thursday , June 4 2026
Breaking News

मध्यवर्ती म. ए. समितीकडून आम. चंद्रकांत पाटील यांचे सांत्वन

Spread the love

बेळगाव : महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी -सदस्यांनी मंगळवारी दुपारी कोल्हापूर मुक्कामी त्यांची भेट घेऊन सांत्वन केले.

महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील (वय 91) यांचे काल रविवारी सायंकाळी वृद्धापकाळाने संभाजीनगर, कोल्हापूर येथील निवासस्थानी निधन झाले होते.

यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली दत्ता उघाडे, महेश जुवेकर, राजू ओऊळकर व जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी आज कोल्हापूर मुक्कामी आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

About Belgaum Varta

Check Also

बसथांबे व सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सहकार्याचे आवाहन

Spread the love  बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावने शहरातील बसथांबे, पदपथ, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांवरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *