Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

बेळगावात मराठा इंन्फट्रीचा सतरावा युद्धोत्तर ‘सिनर्जी’ सोहळ्याला प्रारंभ

  बेळगाव : सिल्व्हर बँड आणि पाईप बँडने सुरेल धून आणि त्याच्या तालावर तिन्ही सैन्यदलाच्या पथकांचे शानदार, शिस्तबद्ध संचलन, रेजिमेंटच्या ध्वजाला मानवंदना देऊन युद्ध स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन करून बेळगावात आज मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या सतराव्या युद्धोत्तर पुनर्मिलन ‘सिनर्जी’ सोहळ्याला प्रारंभ झाला. कॅम्प, बेळगाव येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये आज, …

Read More »

गांधी कुटुंबाचा सल्ला, पाठिंबा घेण्यास लाज वाटत नाही

  मल्लिकार्जुन खर्गे, रिमोट कंट्रोलच्या चर्चेवर प्रतिक्रीया बंगळूर : मी पक्षाध्यक्ष झालो तर गांधी कुटुंबाचा सल्ला आणि पाठिंबा घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी संघर्ष केला आणि पक्षाचा कारभार चालवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवार येथे सांगितले. एआयसीसी अध्यक्ष झाल्यानंतर खर्गे गांधी …

Read More »

आंबेवाडी गावातील स्मशानभूमीची स्वच्छता!

  बेळगाव : आंबेवाडी गावातील स्मशानभूमीची स्वच्छता बेळगाव ग्रामीण भाजपचे युवा नेते विनय विलास कदम यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिक असोसिएशन आंबेवाडी यांच्या सौजन्याने करण्यात आली. समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेने विनय कदम आणि सहकाऱ्यांनी स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी कॅप्टन कृष्णा शहापुरकर, कॅप्टन परशराम भांदुर्गे, आप्पाजी इंचले, मारुती …

Read More »

बेळगावमधील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार

  बेळगाव : वृत्तपत्र विक्रेता वितरण दिनानिमित्त भाजप ओबीसी मोर्चा कर्नाटक राज्य सचिव व विमल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. किरण जाधव यांच्यावतीने टाइम्स ऑफ इंडिया आणि विजय कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार समारंभ श्री. किरण जाधव यांच्या संपर्क कार्यालय न्यू गुड शेड रोड येथे आयोजित करण्यात आला होता. …

Read More »

सरकारने ऊस दर निश्चित न केल्यास 21ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यव्यापी आंदोलन

बेळगाव : कर्नाटकातील साखर कारखान्यांनी अजूनही 2700 रु. पर्यंतच दर ठेवल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चाचा ताळमेळ पहाता तो अजिबात शेतकऱ्यांना परवडत नसल्याने 5500 रु दर द्यावा म्हणून परवाच बेळगावमधे रयत संघटना, हरित सेनेतर्फे हजारो शेतकऱ्यांनी अशोक चौक ते चन्नम्मा चौकपर्यंत मोर्चा काढून नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहोरात्र आंदोलन छेडल्याने सरकार खडबडून जागे …

Read More »

दर जाहीर करूनच कारखाने सुरू करा

  साखरमंत्री शंकर पाटील यांचा आदेश : बेंगळूरात कारखानदार-रयत संघटनांसमवेत बैठक निपाणी (वार्ता) : यंदा कोणत्याच साखर कारखान्याने दर जाहीर न करता साखर कारखाने सुरू केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे दर जाहीर केल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्याने ऊस गाळप करू नये तसेच मागील एफआरपीची थकीत रक्कम दिल्याशिवाय संबंधित साखर कारखान्याने यावर्षीचा …

Read More »

मध्यरात्री भीषण अपघात; 5 मुलांसह 9 जणांचा मृत्यू 

  हसन : अरसिकेरे तालुक्यातील गांधीनगरजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. धर्मस्थळावरून परतणाऱ्या टीटी वाहनाला बस आणि लॉरीची धडक झाली. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 69 वर घडली. यात 5 मुलांसह 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 5-6 जण जखमी झाले आहेत. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »

भारताच्या रक्तातील एकता, प्रेम, सद्भावना पुसली जाऊ शकत नाही : राहुल गांधी

  बळ्ळारीत जाहीर सभा, पदयात्रेचा एक हजार किमीचा टप्पा पूर्ण बंगळूर : एकता, प्रेम आणि सुसंवाद ही कर्नाटक आणि भारताची परिभाषित पात्रे आहेत. उजव्या विचारसरणीच्या गटांनी त्यांना हटवण्याचा पुढील ५० वर्षांत प्रयत्न केला तरीही ते पुसले जाऊ शकत नाही, असे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी सांगितले. ते …

Read More »

गोजगा, आंबेवाडी येथे काळ्या दिनाची जनजागृती

  बेळगाव : आज दि. 15 रोजी गोजगा, आंबेवाडी येथे जावून समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना १ नोव्हेंबर म्हणजेच ‘काळा-दिन’ या संदर्भात जागृत करून, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची ठरलेली रुपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या-दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केले‌. सदर जागृतीपर कार्यक्रमाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते …

Read More »

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवारी

  बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवार दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर “काळादिन” संदर्भात तसेच इतर महत्वाच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात येईल. समितीचे पदाधिकारी, नागरिक, युवा कार्यकर्ते यांनी वेळेवर हजर राहावे, असे …

Read More »