Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

शोकसभेत ॲड. राम आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  बेळगाव : बेळगाव परिसरातील सर्व शैक्षणिक, सामाजिक संस्था आणि सर्व राजकीय पक्ष यांच्यातर्फे मंगळवारी सायंकाळी आयोजित शोकसभेमध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे लढवय्ये नेते, नामवंत वकील, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते व बेळगाव शाखा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत ॲड. राम आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरातील कॅम्प येथील …

Read More »

एक इंचही जमीन कोणाला देणार नाही : कर्नाटक विधान परिषदेतही ठराव

  महाजन अहवालानुसार सीमाप्रश्न संपल्याचा कांगावा बेळगाव/बंगळूर : महाजन अहवालानुसार सीमाप्रश्न संपला असून, एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, कर्नाटकाची जमीन, पाणी आणि भाषेच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा आशयाचा ठराव कर्नाटक विधान परिषदेत आज मंजूर करण्यात आला. कायदामंत्री माधुस्वामी यांनी मांडलेल्या या ठरावावर झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते बी. के, …

Read More »

प्रकाश शिरोळकरांचा आढमुठेपणा!

बेळगाव : 66 वर्षाचा सीमालढा नेहमीच गांभीर्याने लढला जातो. अनेक हुतात्म्यांनी बलिदान देऊन आणि अनेक कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्या खाऊन हा लढा जिवंत ठेवला आहे. या लढ्याचे गांभीर्य कोणत्याही परिस्थितीत गढूळ होऊ नये याची दक्षता सर्वच घटकांनी घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीचा विचार करता कांही अप्रिय घटना घडतात आणि त्यावेळी सीमावर्ती भागातील …

Read More »

सीमाभागातील मराठी बांधवांसाठी घेतलेल्या निर्णयांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांचा मुख्यमंत्री सहायता देणगी योजनेत समावेश, महात्मा फुले जन आरोग्य योजनाही लागू नागपूर : कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सीमा …

Read More »

महाराष्ट्राच्या ठरावाचा कर्नाटकच्या नेतेमंडळींकडून तीव्र निषेध

  बेळगाव : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संमत करण्यात आलेल्या ‘कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंचनइंच जमीन महाराष्ट्राचीच आहे’, या ठरावाचा कर्नाटकच्या नेतेमंडळींनी तीव्र निषेध केला असून एक इंचही जमीन महाराष्ट्राला मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या ठरावाला आमचा विरोध : डी. के. शिवकुमार सीमाप्रश्नी आज महाराष्ट्र विधानसभेने केलेल्या …

Read More »

अरविंद कापाडिया यांनी येळ्ळूर ग्रामपंचायत ग्रंथालयाला दिली पुस्तकांची भेट..

  बेळगाव : पुस्तकं दान केल्याचा आनंद हा वेगळा असतो, हे ज्ञान दान दिल्यानं कमी न होता वाढणार असं एकमेव दान आहे. अरविंद कपाडिया यांनी येळ्ळूर ग्राम पंचायत ग्रंथालयात बरीच पुस्तके देऊन वाचक वर्ग वाढवा अशी इच्छा व्यक्त केली. ग्रामीण भागात वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी सरकारच्या योजनेअंतर्गत येळ्ळूर पंचायत अध्यक्ष …

Read More »

कर्नाटक राज्य मडीवाळ संघाचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

  बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य मडीवाळ संघाने मंगळवारी सुवर्ण विधान सौधजवळील बस्तवाड येथे आंदोलन केले. मंगळवारी मडीवाळ संघाने आंदोलन छेडून आपली विविध मागण्याच्या पूर्ततेचा आग्रह केला. विष्ठा, मूत्र, बाळंतपण, मासिक पाळी, मृत्यू, रोग, पू, रक्त यांनी डागाळलेले सर्व समाजातील लोकांचे कपडे आम्ही हाताने धुतो आणि स्वच्छ …

Read More »

कर्नाटक राज्य संयुक्त आशा वर्कर्स असोसिएशनच्या वतीने आंदोलन

  बेळगाव : आरसीएच पोर्टलच्या विविध समस्यांमुळे गेल्या दोन वर्षांपासून कामगारांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य संयुक्त आशा वर्कर्स असोसिएशनच्या वतीने सुवर्णसौधजवळील बस्तवाड येथे मंगळवारी आंदोलन करण्यात आले. आरसीएच पोर्टलमधील असंख्य समस्यांमुळे अनेक कामांचा मोबदला मिळत नाही. गेल्या दोन वर्षांपासून कोविड नॉन एमटीआयएससाठी 2,000 रु. …

Read More »

तेजस्वीनी कांबळेचा सावंतवाडीत सन्मान

  बेळगाव : बिजगर्णी गावातील सुकन्या कु. तेजस्विनी नागेश कांबळे हिचा सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कु. तेजस्वीनी कांबळे हिने मराठी विषयात सुवर्णपदक प्राप्त केले आहे सीमाभागात मराठीभाषा वाढली पाहिजे. तिचे संवर्धन करणे हे विद्यार्थीदशेतच आवश्यक आहे. मराठीभाषेविषयी अभिमान वाटतो. मराठीतील पुस्तके वाचायला …

Read More »

नवीन वर्षाच्या उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

मास्क अनिवार्य, पार्टी सकाळी एक पर्यंतच बेळगाव/बंगळूर : चीनमधील कोरोनाव्हायरस संसर्ग आणि देशातील ओमिक्रॉन सबवेरिएंट बीएफ ७ च्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने, कर्नाटक सरकारने सोमवारी नवीन वर्षाच्या उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आणि सर्वांसाठी मास्क अनिवार्य केले. नववर्ष साजरे करण्यास पहाटे १ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. सरकारने …

Read More »