Saturday , February 8 2025
Breaking News

प्रकाश शिरोळकरांचा आढमुठेपणा!

Spread the love
बेळगाव : 66 वर्षाचा सीमालढा नेहमीच गांभीर्याने लढला जातो. अनेक हुतात्म्यांनी बलिदान देऊन आणि अनेक कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्या खाऊन हा लढा जिवंत ठेवला आहे. या लढ्याचे गांभीर्य कोणत्याही परिस्थितीत गढूळ होऊ नये याची दक्षता सर्वच घटकांनी घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीचा विचार करता कांही अप्रिय घटना घडतात आणि त्यावेळी सीमावर्ती भागातील जनतेचा मानभंग होण्याचा प्रसंग येतो. अशा प्रकारच्या लोकांना धडा शिकवण्याची गरज आहे.
काल कोल्हापूर येथील सर्वपक्षीय धरणे आंदोलन यशस्वी झाले. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत समिती नेत्यांनी धरणे आंदोलन करून कोल्हापूर कलेक्टर यांच्यामार्फत भारताच्या पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी निवेदन दिले व सीमावासीयांच्या व्यथा मांडल्या. मात्र स्वतःला नेते म्हणवणार्‍या बेळगाव शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांच्या आढमुठेपणामुळे उपस्थितांत नाराजी पसरली आहे. सीमालढ्यात तसा फारसा सहभाग नसलेल्या, नेहमीच आयत्या पिठावर रेगोटे मारणार्‍या प्रकाश शिरोळकरांनी केवळ फोटोमध्ये येऊन प्रसिद्धी मिळविण्यासाठी समितीच्या महिला कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की करत स्वतःसाठी फोटोमध्ये जागा निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न शिरोळकर यांच्याकडून झाला. त्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये देखील समिती तसेच कोल्हापूरातील काही कार्यकर्त्यांशी हुज्जत घालण्याचा निंदनीय प्रकार प्रकाश शिरोळकर यांनी केला आहे. त्यामुळे बेळगावकरांची प्रतिमा मालिन करण्याचे काम शिरोळकरांनी केले आहे.
प्रकाश शिरोळकर हे मुळातच कार्यकर्ताहीन नेता म्हणून ओळखले जातात. माजी उपमहापौर व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणवून घेणार्‍या प्रकाश शिरोळकरांनी आजपर्यंत सीमालढ्यासाठी कोणतेही आंदोलन पुकारल्याचे ऐकिवात नाही मात्र समितीने पुकारलेल्या लढ्यात येऊन श्रेय लाटण्याचा प्रकार यांच्याकडून वारंवार होत असतो. शिरोळकरांच्या या कृतीला मध्यवर्तीच्या नेत्यांनी चाप घालणे गरजेचे आहे, असे मत समिती महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खाजगी वैद्यकीय प्रतिष्ठान कायद्यासंदर्भात भारत असोसिएट्स संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहरातील रुग्णांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कर्नाटक खाजगी वैद्यकीय प्रतिष्ठान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *